महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू काश्मीरमध्ये 60 तासात तीन हल्ले

06:22 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कठुआमध्ये हवालदार हुतात्मा : तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत तीन दहशतवादी घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्या 60 तासांत रियासी, कठुआ आणि डोडामध्ये एकापाठोपाठ तीन दहशतवादी घटना घडल्या. यामध्ये 9 भाविकांना प्राण गमवावे लागले. तसेच एक लष्करी हवालदार हुतात्मा झाला असून तीन दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या तीन दिवसातील तीन घटनांमध्ये 5 जवानांसह एकूण 48 जण जखमी झाले आहेत. पहिला दहशतवादी हल्ला रियासीमध्ये झाला, तर दुसरा कठुआमध्ये आणि आता तिसरा हल्ला डोडामध्ये झाला. डोडा येथील हल्ल्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले आहेत. वाढत्या हल्ल्यांमुळे लष्कराने विशेष शोधमोहीम सुरू केली आहे. कठुआमध्ये हिरानगर तहसीलच्या सोहल भागात दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. लष्कराच्या प्रत्युत्तरादाखल दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

डोडा येथील लष्कराच्या चौकीवर हल्ला

कठुआनंतर मंगळवारी रात्री उशिरा डोडामध्येही दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळाला लक्ष्य केले आहे. या गोळीबारात पाच जवान आणि एक एसपीओ अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. लष्कराने सध्या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. कठुआमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दिवसभरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मंगळवारीही सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article