Tardal Crime | तारदाळमध्ये जुन्या वादातून टोकाचा थरार! घरात घुसून तिघांना बेदम मारहाण; ६ जणांवर गुन्हा
तारदाळमध्ये घरात घुसून मारहाण, सहाजणांवर गुन्हा दाखल
यड्राव : तारदाळ ता. हातकणंगले येथेपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फायटर व लाथाबुक्याने बेदम मारहाण करून तिघांना जखमी केले. ही घटना दि. १५ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी ओम सुहास नर्मदे वय १९ रा. जावईवाडी तारदाळ यांनी फिर्याद दिली. सुजल नलवडे, जय उर्फ मोन्या ओगले, यश ओगले, हेमंत मुसळे, युवराज उर्फ प्रीतम खांडेकर व विजय शिंदे या सहा जणांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ओम नर्मदे व सुजल नलवडे एकमेकाचे नातेवाईक असून त्यांच्यामध्ये यापूर्वी भांडण झाले -होते त्याचा राग मनात धरून ओम नर्मदे व त्याचा भाऊ गणेश नर्मदे हे मोटरसायकलवरून आरोही बियर बारजवळ आले असताना
सुजल नलवडे व जय ओगले यांनी त्यांची मोटरसायकल अडवून मारहाण केली. तर जय ओगले याने ओम नर्मदे याच्या पाठीत फायटर मारून जखमी केले. त्यानंतर जखमी अवस्थेत ओम व गणेश हे शहापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजल्यानंतर जय ओगले यांनी फोनवरून जर आमच्या विरोधात तक्रार दिलीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ केली त्यानंतर सुजल नलवडे यांनी बेकादेशीर जमाब जमवून तीन मोटरसायकलवरून ओम नर्मदे यांचे घर गाठले व घरात घुसून घरात बसलेले सागर नर्मदे व अजय चौगुले यांना मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे तारदाळ व परिसरात भीतीचे व दहशतीचे बाताबरण निर्माण झाले आहे.