बनावट नोटा चलणात आणणारे तिघे जेरबंद
कोल्हापूर :
शहरातील एका बँकेमध्ये पाचशे रुपयांचा बनावट नोटाचा भरणा कऊन, बँकेची फसवणूक करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या त्रिकुटाचा छडा लावून, त्याच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी शहरातील जुना राजवाडा पोलिसांनी बजावली. अमोल गणपती पोतदार (वय 47, रा. बी वॉर्ड, डाकवे गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर), निखील किशन सरगर (वय 30, मुळ रा. करणगी, ता. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा. दुसरी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर), शिवप्रसाद दिलीप कदम (वय 25, मुळ रा. वारणा कापशी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर, सध्या रा. जयलिला अपार्टमेंट, दाभोळकर कॉर्नर नजीक, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. तिघापैकी अमोल पोतदार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी या तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याना पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली.

पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे म्हणाले, गुन्हेगार अमोल पोतदार याची पत्नी स्वप्नाली पोतदार हिचे शहरातील खरी कॉर्नर येथील कोटक महिंद्रा बॅँकेत खाते आहे. या खात्यावर मुलगा अधिराज याला पाचशे ऊपयांच्या असली नऊ आणि बनावट 66 अशा 75 नोटा भरण्यासाठी दिल्या. त्यांने या रोकडची भरणा बँकेच्या एटीएमसीडीएम मशिनव्दारे केल्या. या 75 नोटापैकी 66 नोटा बनावट असल्याचे बँकेच्या व्यवस्थापकाच्या 24 नोव्हेंबर,2024 रोजी निदर्शनास आल्या होत्या. याबाबत बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार 28 नोव्हेंबर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या बनावट नोटा प्रकरणाचा तपास जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमारे झाडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि गुन्हे शोध पथक करीत होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या बनावट नोटा संशयीत अमोल पोतदार याने पत्नीच्या बॅक खात्यामध्ये भरणा केल्याचे उघड झाले होते.
चौकशीमध्ये पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आपल्याला निखील सरगर नावाच्या मित्राने दिल्या होत्या. त्याच बनावट नोटा बॅँकेत भरल्या होत्या. त्या बनावट आहेत की नाही हे आपणास माहित नसल्याचे सांगितले होते. तेव्हापासून पोलीस बेपत्ता असणारा निखील सरगरचा शोध घेत हेते. गेल्या काही दिवसांपूर्वी तो सांगली जिह्यातील करगणी (ता.आटपाडी, जि. सांगली) गावात आश्रयाला असल्याची माहिती मिळाली. त्यावऊन त्या गावामध्ये तो आश्रयाला थांबलेल्या ठिकाणी छापा टाकून त्याला अटक केली.
त्याच्याकडे बनावट नोटाबाबत कसून चौकशी सुऊ केली. चौकशीमध्ये त्याने गुन्हेगार पोतदार आपल्याला कमी टंचाची सोन्याची चेन देणार असल्याने, त्याला मी पाचशे ऊपयांचा बनावट नोटा दिल्याची कबुली दिली. तसेच त्याला या नोटा बनावट असल्याची माहिती सुध्दा दिल्याचे त्याने सांगितले. त्याचबरोबर या बनावट नोटा शिवप्रसाद कदम याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यावऊन पोलीसांनी शिवप्रसाद याचा शोध घेवून त्यालाही अटक केली. यासर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याना 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी संशयीत शिवप्रसाद याच्याकडे संबंधीत पाचशे ऊपयांच्या बनावट नोटा कोठून आणि कोणाकडून आणल्या, की त्याची छपाई स्वत: केली. याविषयी त्याच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी सुऊ केली आहे. या बनावट नोटा प्रकरणाची फिर्यादी जोतिबा वसंतराव तिरवीर (वय 33, रा. हिराश्री लेकसिटी अपार्टमेंट, रंकाळा, अंबाई टॅँक, कोल्हापूर) यांनी दिली आहे. या कारवाईत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस हवालदार प्रशांत घोलप, सतिश बांबरे, अमर पाटील, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, आदींचा सहभाग होता.
- आणखीन बनावट नोटा चलनात ?
पाचशे ऊपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल पोतदार, निखिल सरगर, शिवप्रसाद कदम या तिघांना अटक केली आहे. हे तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्याच्याकडे बनावट नोटाची छपाई कोठे केली. यामध्ये आणखीन कोणी आहे. याबरोबर या तिघांना आणखीन बनावट नोटा चलनात आणल्या आहेत ? याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुऊ केली आहे. चौकशी मध्ये तिघांना आणखीन माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी ही माहिती तपासाच्या नावाखाली देण्याबाबत गोपनीयता बाळगली आहे.