महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साडेतीन कोटी उकळणारे जोडपे गजाआड

12:59 PM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भूखंड, फ्लॅट देण्याच्या आमिषाने उकळले पैसे : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सुरु झाली चौकशी,पती-पत्नी पोस्टवाडा, होंडा येथील रहिवासी

Advertisement

पणजी : फोंड्याच्या इस्पितळात सरकारी कर्मचारी असलेला आणि पोस्टवाडा होंडा येथील रहिवासी असलेला विजयनाथ गावडे याने साधेपणाचा लाभ उठवून अनेक लोकांना फ्लॅट, घर बांधण्यासाठी जमिनीचा तुकडा देतो असे सांगून पैसे उकळले. ही रक्कम जवळपास 3.50 कोटी ऊपयांची असण्याची शक्यता आहे. विजयनाथ व त्याची पत्नी विदिशा गावडे हिला फोंडा पोलिसांनी काल मंगळवारी अटक केली. मात्र त्यांच्याकडून उकळलेले पैसे वसूल कसे होतील, याबाबत गुंतवणूकदारांना फार चिंता आहे. एक सरकारी कर्मचारी व त्याला वेळच्यावेळी वाढीव भत्त्यांसह वेतन मिळत असताना देखील त्वरित श्रीमंत होण्याचे वेध त्याला लागले असावे. त्यामुळेच त्याने हे अशा प्रकारचे धंदे केले आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. हे पैसे कदाचित त्याने खासगी कंपन्यांमध्ये गुंतविलेले असावे मात्र जनतेचे घेतलेले पैसे तो देण्यास तयार होत नाही हे पाहून जनतेमध्ये बरीच खळबळ उडाली.

Advertisement

 मुख्यमंत्र्यांच्या घरी जमले गुंतवणूकदार

मंगळवारी सकाळी सांखळी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन गुंतवणूकदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, आपल्याकडे होंडा, कुडणे, सांखळी, हरवळे या भागातील अनेकजण आले व त्यांच्याकडून या जोडप्याने फ्लॅट किंवा घर बांधण्यासाठी जमीन मिळवून देतो असे सांगून पैसे उकळले आहेत, असे सांगितले. प्रत्यक्षात पैसे घेऊन झाल्यानंतर दोन-तीन वर्षात त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.

 मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या तक्रारी

ज्यांनी पैसे दिले होते, ते लोक स्वत:चे पैसे मागायला गेल्यानंतर विजयनाथ गावडे हा गुंतवणूकदारांना दाद देत नव्हता. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संशय निर्माण झाला. त्यांनी सविस्तर चौकशी केली असता या व्यक्तीने अनेकांकडून अशाच पद्धतीने पैसे घेतलेले आहेत, हे उघड झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली भेट घेत कारवाईची मागणी केली. त्यानुसार आपण पोलिसांना याविषयी कारवाई करण्याचा आदेश दिल्याची माहिती मुख्dयामंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी विजयनाथ गावडे याला त्याच्या पत्नीसह अटक करण्यात आली. सरकारी कर्मचारी असताना झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग या व्यक्तीने का स्वीकारला हे समजत नाही. विजयनाथला त्याची पत्नी या कामी साथ देत होती, त्यामुळे दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

भिवा गावस यांच्या तक्रारीनुसार अटक

भूखंड विक्री व्यवहारात ऊ. 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विजयनाथ गावडे व विदिशा गावडे (रा. पोस्टवाडा, होंडा) या पती-पत्नीविरोधात फोंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघाहीजणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागझर, कुर्टी फोंडा येथील तक्रारदार भिवा मडसो गावस यांच्याशी संशयितांनी भूखंड विक्रीसाठी व्यवहार केला होता. तक्रारदाराने भूखंडाची आगाऊ रक्कम ऊ. 10 लाख त्यांना दिली होती. मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार भूखंड तक्रारदाराला मिळाला नाही. शिवाय आगाऊ ऊ. 10 लाखांची रक्कमही संशयितांकडून परत न मिळाल्याने भिवा गावस यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. संशयित पती-पत्नी विरोधात भा. दं. सं.च्या कलम 420 म्हणजेच फसवणूक व अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article