1700 वर्षे जुन्या तीन मकबऱ्यांचा शोध
थडग्यांमधून मिळाला खजिना
चीनला पुरातत्व सर्वेक्षणात मोठे यश मिळाले आहे. लुओयांग आर्कियोलॉजिकल रिसर्च इन्स्टीट्यूटच्या तज्ञांनी चीनमध्ये 3 प्राचीन थडग्यांचा शोध लावला आहे. ही थडगी सुमारे 1700 वर्षांपूर्वीची असून ती एखाद्या श्रीमंत कुटुंबाच्या सदस्यांची असल्याचे मानले जात आहे. शुनझुआंग गावानजीक झालेल्या उत्खननात ही थडगी सापडली आहेत. या थडग्यांमध्ये दैनंदिन गरजेची सामग्री आणि दागिने सापडले आहेत. यातून संबंधित दफन करण्यात आलेले लोक हे त्याकाळात धनाढ्या राहिले असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या थडग्यांच्या वर मकबरा देखील अत्यंत विशाल आहे. हा शोध प्राचीन संस्कृती आणि त्यांच्या प्रथा समजून घेण्यासोबत या क्षेत्रातील इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण युगादरम्यान श्रीमतांच्या जीवनपद्धतीवर प्रकाश टाकणारा आहे.
या तीन थडग्यांची एम1, एम2 आणि एम3 अशी नावे ठेवण्यात आली आहेत. ही थडगी जिन राजवंश (265-317) किंवा त्यापूर्वीच्या काओ वेई काळातील (220-265) असल्याचे मानले जातेय. नियोजनबद्ध पद्धतीने निर्माण करण्यात आलेल्या मकबऱ्याच्या उत्तर दिशेने थडगी तर दक्षिण दिशेला एक मार्ग आहे. सर्वात मोठा मकबरा एम1 स्वत:चा विशाल आकार आणि मजबूत संरचनेसाठी ओळखला जातो. यात एक दरवाजा, कॉरिडॉर, दगडी दरवाजा, मुख्य कक्ष, पूर्व कक्ष आणि मार्गासोबत बारा ख•s दिसून येतात.
200 हून अधिक कलाकृती
एम1 च्या आत पुरातत्वतज्ञांनी 200 हून अधिक कलाकृतींचा खजिना शोधला असून यात हस्तिदंत आणि लॅकरवेअरचे तुकडे यासारख्या दुर्लभ गोष्टी सामील आहेत. विशेषकरू फीनिक्स आणि पक्षी पॅटर्नद्वारे सजविण्यात आलेल्या हाडांची एक जोडी यात आढळली आहे. तसेच भांडीही हस्तगत झाली आहेत. दफन करण्यात आलेल्या महिलांपैकी एकीच्या थडग्यानजीक या कलाकृती ठेवण्यात आलेल्या असाव्यात, यातून तेव्हा दफनाची पद्धत कशाप्रकारची होती हे स्पष्ट होते. थडग्यांमधून मिळालेल्या या सामग्रीला तज्ञांनी एक महत्त्वाचा खजिना संबोधिले आहे.
एम1 सोबत एम2 आणि एम3 आकाराने लहान आहेत, परंतु तेथेही अनेक कलाकृती सापडल्या आहेत. तसेच संरचनात्मक स्वरुपात ते देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या मकबऱ्यांमधून मातीची भांडी, कांस्य, लोखंड, हाडांद्वारे तयार कलाकृती, सोने आणि नाणी सापडली आहेत. तिन्ही थडग्यांमधून हस्तगत सामग्री पाहता त्या सामूहिक दफन प्रथा तसेच जिन राजवंशाच्या काळातील समाज समजून घेण्यास महत्त्वपूर्ण असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.