महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांना अ‍ॅट्रॉसिटीची धमकी

11:05 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केआरएस पक्षाचे जि. पं. कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ग्रा. पं.व्याप्तीत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची पुराव्यासहित माहिती देऊनही जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही. भ्रष्टाचारावर आळा घालण्यास जि. पं. कडून दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप करून केआरएस पक्षातर्फे जि. पं. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांवर भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांकडून अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची भीती दाखवून धमकावले जात असल्याचा आरोप केआरएस पक्षाचे नेते सिद्दू कणबर्गी यांनी केला. जिल्ह्यातील रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल आदी तालुक्यातील ग्रा. पं. च्या व्याप्तीत राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. आश्रय घरे मिळवून देण्यापासून ते रोजगार हमी योजनेमध्ये काम न करताच कामगारांच्या नावे बोगस कार्ड तयार करून निधी लाटला जात आहे.

Advertisement

याबाबत जि. पं. कडे चौकशी करण्यासाठी अनेकवेळा निवेदने देऊन पुरावेही सादर करण्यात आले आहेत. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीच चौकशी केली जात नाही. त्यामुळे भ्रष्टाचारांचे फावले आहे. यामध्ये गोरगरीब जनता भरडली जात आहे. तर सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये आर्थिक लूट होत आहे. काम न करताच निधी लाटला जात आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल केआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या धोरणाचा विरोध करत हे आंदोलन केले. जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी येऊन उत्तर द्यावे. दिलेल्या निवेदनावर कारवाई का झाली नाही? याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत जि. पं. कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच धरणे आंदोलन केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article