For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : हातकणंगले तहसीलदारांना धमकी, शिवीगाळ

02:15 PM Jan 11, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   हातकणंगले तहसीलदारांना धमकी  शिवीगाळ
Advertisement

                     गौण खनिज वाहतूक तपासणीवेळी सरकारी अधिकाऱ्यांना अरेरावी

Advertisement

पुलाची शिरोली : हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना अरेरावीची भाषा, धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी शिये (ता.करवीर) येथील गौण खनिज व्यावसायिक व डंपर मालक व शिये ग्रामपंचायत सदस्याच्या भावावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रमेश सर्जेराव शिंदे असे संशयिताचे नाब आहे. फिर्याद टोप येथील गाव कामगार तलाठी अमोल विमलकुमार कोटे यांनी दिली.

याबाबत घटनास्थळ व शिरोली एमआयडीसी 5 पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तहसीलदार 5 सुशील बेल्हेकर, क्लार्क गजानन मेघमाळे व गाव कामगार तलाठी अमोल कोटे हे शनिवारी सकाळी दहा वाजता टोप संभापूर कासारवाडी व शिये येथे अवैध गौण खनिज वाहतूक करीतअसलेल्या डंपरची तपासणी करीत होते. शिये फाटा येथे रमेश शिंदे याच्या मालकीचा डंपर तहसीलदार व त्यांच्या पथकाने अडविला. यावेळी चालकाकडे गौण खनिज (दगड) बाहतूक करीत असलेला परवाना व इतर कागदपत्रांची मागणी केली.

Advertisement

यावेळी चालकाकडून काहीही कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे डंपर मालक रमेश शिंदे याला तहसीलदार बेल्हेकर यांनी घटनास्थळी बोलावून घेतले. यावेळी रमेश शिंदे यांनी डंपर अडवून तपासणी करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे. अशी अरेरावीची भाषा वापरून धमकी दिली तसेच शिवीगाळही केली. त्यानंतर टोप गावचे गाव कामगार तलाठी अमोल कोटे यांनी रमेश शिंदे याच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सपोनी सुनील गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.