For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारागृहातून पुन्हा धमकीचे फोन कॉल?

11:14 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारागृहातून पुन्हा धमकीचे फोन कॉल
Advertisement

मोबाईलसाठी अधिकाऱ्यांची शोधमोहीम

Advertisement

बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा धमकीचे फोन कॉल सुरू झाले आहेत का, असा संशय बळावला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कारागृहात शोधमोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत मात्र अधिकाऱ्यांना मोबाईल सापडला नाही. कारागृह विभागाचे डीआयजी टी. पी. शेष सध्या रजेवर आहेत. गुलबर्गा येथील डीआयजी रंगनाथ यांच्याकडे तात्पुरता बेळगावचाही पदभार सोपविण्यात आला असून गुरुवार दि. 11 जुलै रोजी ते बेळगावला आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत कारागृहात तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांची बेंगळूरला बदली झाल्यानंतर ते पद रिक्त आहे. अधीक्षक कोट्रेश, साहाय्यक अधीक्षक कृष्णमूर्ती आदींच्या उपस्थितीत गुरुवारी सर्व बराकींची तपासणी करण्यात आली असून खास करून उद्योजक आर. एन. नायक हत्या प्रकरणातील आरोपी बन्नंजे राजा याला ठेवण्यात आलेल्या बराकीतही तपासणी झाली आहे. शोध मोहिमेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी बॉडी कॅमेऱ्यांसह वेगवेगळ्या बराकीत मोहीम राबविली असून या संबंधी कारागृहाचे अधीक्षक कोट्रेश यांच्याशी संपर्क साधला असता गुरुवारी शोधमोहीम राबविण्यात आली आहे ही गोष्ट खरी आहे मात्र ती नियमितपणे केली जाणारी तपासणी असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.