For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पत्नीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

11:13 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
पत्नीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Advertisement

सीईएन पोलिसांनी आवळल्या मुसक्या : घटस्फोट मिळविण्यासाठी खटपट

Advertisement

बेळगाव : कौटुंबिक वादातून पत्नीचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या पतीला येथील जिल्हा सीईएन पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावरही हे प्रकरण ठळक चर्चेत आले आहे. किरण पाटील (वय 28) रा. अम्मणगी, ता. हुक्केरी असे त्या पतीचे नाव आहे. जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी किरणला अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. दीड-दोन वषर्पूंर्वी किरणचे लग्न झाले आहे. त्याला पत्नीपासून घटस्फोट घ्यायचा होता. यासाठी त्याने पत्नीवर दबावही आणला. घटस्फोट दिली नाहीस तर तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी दिल्यानंतर त्याच्या पत्नीने सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी किरणला बेळगावला बोलाविले. कारवाई टाळण्यासाठी पोलीस स्थानकाबाहेर त्याने विषप्राशन केले. पोलिसांनी तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. त्यावेळी पोलिसांनी किरणला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई पूर्ण केली आहे. सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून मोबाईलमध्ये किरणने आपल्याच पत्नीचे चित्रित केलेले काही व्हिडिओ आढळले आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.