For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेघालयात इस्लामिक स्टेटच्या नावाने मिळाली धमकी

07:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेघालयात इस्लामिक स्टेटच्या नावाने मिळाली धमकी
Advertisement

गारो समुदायाला धमकी : पोलिसांकडून तपास सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/शिलाँग

मेघालयाच्या वेस्ट गारो हिल्स जिल्ह्यात एक वादग्रस्त पोस्टर मिळाल्यावर तणावाचे वातावरण आहे. या पोस्टरवर दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा उल्लेख आहे. यात स्थानिक गारो समुदायाला स्वत:ची जमीन खाली करण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पोस्टर जिल्ह्यातील तुरा भागात मिळाले आहे. यात इंग्रजी भाषेत फुबारी, राजाबाला, टिकरीकिला, सेसला आणि गारोबाधा यासारख्या क्षेत्रांचा उल्लेख आहे. या भागांमध्ये राहणाऱ्या गारो समुदायाच्या लोकांनी 2027 पूर्वी स्वत:ची जमीन सोडून द्यावी. असे न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी पोस्टरद्वारे देण्यात आली आहे.

Advertisement

पोस्टरवर अमीनुर इस्लाम असे नाव लिहिण्यात आलेले आहे. दहशतवादी संघटनेचे कृत्य आहे का केवळ भय पसरविण्यासाठी या नावाचा वापर करण्यात आला आहे याचा पोलीस तपास घेत आहेत. राज्याचे मंत्री मार्क्यूस मारक यांनी या घटनेची निंदा केली आहे. समाजाच्या सांप्रदायिक सद्भावाला बिघडविणाऱ्या अशा धमक्या सहन केल्या जाणार नाहीत असे मार्क्यूस यांनी म्हटले आहे. अलिकडेच जिल्ह्यात एका युवा पर्यावरण कार्यकर्त्याची जमावाने हत्या केली होती, या पार्श्वभूमीवर ही धमकी मिळाली आहे.

Advertisement
Tags :

.