For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पत्रकाराला धमकी । कणकवलीतील महिला डॉक्टरवर गुन्हा

12:33 PM Nov 24, 2023 IST | अनुजा कुडतरकर
पत्रकाराला धमकी । कणकवलीतील महिला डॉक्टरवर गुन्हा
Advertisement

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी

येथील डिजिटल मीडियाचे पत्रकार भगवान लोके यांना धमकी दिल्याप्रकरणी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ अर्पिता आचरेकर यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पत्रकार लोके यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसुतीसाठी वणवण करावी लागते या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती . आणि या गोष्टीचा राग मनात ठेवून आचरेकर यांनी लोके यांना फोन करून शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली . या प्रकरणी स्त्रीरोगतज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम 2017 चे कलम 4 तसेच भादंवी कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हा जिल्ह्यातील पहिला गुन्हा आहे, असा दावा करण्यात आलाय . सिंधुदुर्ग जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.