For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना धमकी

06:05 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना धमकी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान मोदींना त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस या धमकीचा तपास करत आहे. ‘द ऑस्ट्रेलिया टुडे’च्या वृत्तानुसार, ‘मेलबर्न मीट्स मोदी’ या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी असलेल्या एका फेसबुक पोस्टखाली ही धमकी देण्यात आली होती. अबू मुस्तफा नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून केलेल्या या पोस्टमध्ये ‘कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छत बंदच राहिले पाहिजे, नाहीतर ते ऑस्ट्रेलियात मृत्यूला सामोरे जाण्यासाठी येतील.’ असा संदेश पाठविण्यात आला आहे. तपास यंत्रणांनी या पोस्टशी संबंधित आयपी अॅड्रेस ओळखला आहे. मोदी 8 जुलै ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलियात असतील. ‘मेलबर्न मीट्स मोदी’ हा कार्यक्रम 9 जुलै रोजी मेलबर्नच्या मार्व्हल स्टेडियममध्ये होणार आहे. पोलिसांनी अद्याप या धमकीवर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. तसेच पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केल्याची पुष्टी केलेली नाही. पंतप्रधान मोदींच्या द्यायासाठीच्या सुरक्षा व्यवस्थेचे समन्वय ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस, राज्य पोलीस आणि विशेष सुरक्षा पथकांसह अनेक यंत्रणांद्वारे केले जाईल.

Advertisement
Advertisement

.