For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जयपूरमधील सीएमओ, विमानतळाला धमकी

06:44 AM Jul 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
जयपूरमधील सीएमओ  विमानतळाला धमकी
Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

जयपूरमधील मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी शनिवारी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन सक्रिय झाले. विमानतळावर तसेच मुख्यमंत्री कार्यालयात तातडीने तपासणी सुरू करण्यात आली. तथापि, तासाभराच्या तपासानंतर पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तरीही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बीडीएस, एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. यापुर्वी गेल्या आठवड्यात दिल्ली आणि बेंगळूरमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बच्या धमक्या प्राप्त झाल्या होत्या.

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्यासंबंधीची धमकी ईमेलद्वारे प्राप्त झाली. त्यात एक ते दोन तासांत स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर विमानतळ आणि मुख्यमंत्री कार्यालय दोन्ही ठिकाणी बॉम्ब पथक, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण पथके तैनात करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून राजस्थानमध्ये धमकीच्या मेलच्या घटना सुरू आहेत. सुमारे 5 दिवसांपूर्वी माहेश्वरी कन्या शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर 3,500 मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यापूर्वी 30 मे रोजी मानसरोवर मेट्रो स्टेशन, कोर्ट कॉम्प्लेक्स येथेही घातपात घडवण्याच्या खोट्या बॉम्ब धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी 8, 12 आणि 13 मे रोजी सवाई मानसिंग स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.