बेंगळुरू येथे 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!
बेंगळुरू येथे १५ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलच्याद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. बसवेश्वरनगर च्या नेपेल आणि विद्याशिल्पा समेच सात शाळांना तसेच येलहंका परिसरातील इतर खासगी शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ईमेल पाठवण्यात आले आहेत.
यानंतर सावधगिरी म्हणून शाळेतील विद्यार्थांना बाहेर काढण्यात आले आणि तपास सुरु केला .मात्र अद्याप पोलिसांना काहीही सापडलेलं नाहीये. दरम्यान हा फेक ईमेल आहे का याचाही तपास सुरु आहे. आज सकाळी शाळेच्या प्रशासनाने मेल चेक केले तेव्हा या धमकीबद्दल माहिती समोर आली. बेंगळुरूचे पोलीस कमिशनर बी दयानंद यांनी सांगितले की बॉम्ब शोधक पथक परिसरात तपास करत आहेत. ज्या शाळांना धमकी मिळाली होती त्यापैकी एका शाळेने पालकांना मेसेज देखील पाठवला होता की, सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही मुलांना घरी परत पाठवत आहोत. यानंतर चिंतेत पडलेल्या पालकांनी शाळेच्या परिसरात मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली.