For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवादी हल्ल्यांचा बांगलादेशात धोका

06:08 AM Apr 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहशतवादी हल्ल्यांचा बांगलादेशात धोका
Advertisement

गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

Advertisement

► वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशात गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. बांगलादेश पोलिसांनी देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी संभाव्य दहशतवादी हल्ल्यांबाबत राष्ट्रीय सुरक्षा सतर्कता जारी केली आहे. संसद परिसर, प्रार्थनास्थळे, मनोरंजन केंद्रे आणि लष्करी व पोलीस आस्थापनांना संभाव्य लक्ष्य म्हणून ओळखण्यात आले आहे. विशेषत: शस्त्रागारेही असुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. ही सतर्कता गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याच्या आधारे जारी करण्यात आली असून ती तातडीची आणि गोपनीय असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

बांगलादेशातील प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या इस्तिक अहमद सामी उर्फ अबू बकर याच्या अलीकडील अटकेनंतर ही सतर्कता जारी करण्यात आली आहे. तो दोन बडतर्फ लष्करी जवानांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. या अहवालांमध्ये संभाव्य हल्ल्यांमागील दोन कथित प्रमुख सूत्रधारांची माहिती देखील समाविष्ट आहे, मात्र कोणत्याही विशिष्ट संघटनेचे नाव घेतलेले नाही. संशयितांना देशाच्या एकूण सुरक्षेसाठी ‘अत्यंत धोकादायक’ असे म्हटले जात आहे. सध्या सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्टवर आहेत. तसेच कोणतीही संशयास्पद दहशतवादी कारवाई निदर्शनास आल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.