For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॉस्कोस्टाईल हल्ल्याची भारताला धमकी

06:38 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॉस्कोस्टाईल हल्ल्याची भारताला धमकी
Advertisement

आयएस पाकिस्तान प्रांताकडून इशारा : पोस्टरमध्ये कंदहारचाही उल्लेख

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इस्लामिक स्टेट पाकिस्तान प्रांत (आयएसपीपी) या दहशतवादी संघटनेने भारताला मॉस्को आणि कंदहारसारख्या हल्ल्यांची धमकी देणारे पोस्टर जारी केले आहे. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा मुखवटा मानली जाते. मॉस्को हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनांचे मनोबल वाढले आहे. एकापाठोपाठ एक दहशतवादी संघटना जगातील विविध देशांना दहशतवादी हल्ल्यांची धमकी देत असून आता इस्लामिक स्टेट पाकिस्तान प्रांत या दहशतवादी संघटनेने भारताला कंदहार आणि मॉस्कोसारख्या दहशतवादी हल्ल्यांची धमकी दिली आहे.

Advertisement

धमकीसंदर्भात दहशतवादी संघटनेने जारी केलेल्या पोस्टमध्ये कंदहार हल्ला आणि मॉस्को हल्ल्याचे फोटोही समाविष्ट करण्यात आले आहेत. आयएसपीपी ही दहशतवादी संघटना स्वत:ला कुख्यात दहशतवादी संघटना ‘आयएस’ची सहयोगी संघटना मानते. विशेष म्हणजे या संस्थेने जारी केलेल्या पोस्टरमध्ये भारताशिवाय डेन्मार्क आणि चीनचीही नावे देण्यात आली आहेत. ही संघटना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची मुखवटा संघटना असल्याचा गुप्तचर सूत्रांचा दावा आहे.

दहशतवादी संघटनेच्या नावाने भारतात दहशत निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार, संघटनेच्या पोस्टरमध्ये इतर देशांची नावे देण्यात आली आहेत. तसेच पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या सांगण्यावरून भारताला धमकी देण्यात आल्याचे मानले जाते. पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती अत्यंत बिकट असून भारतात काही दहशतवादी घटना घडवून आपल्या लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवू इच्छित आहे. याआधी दहशतवादी संघटना ‘आयएसकेपी’ने जगातील इतर मोठ्या देशांमध्ये दहशत निर्माण करण्याची धमकी देणारे पोस्टर जारी केले होते.

Advertisement

.