For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरोवरात मिळाले हजारो वर्षे जुने भाले अन् तलवार

06:30 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
सरोवरात मिळाले हजारो वर्षे जुने भाले अन् तलवार
Advertisement

पोलंडमध्ये लागला पुरातात्विक शोध

Advertisement

पोलंडमध्ये पुरातत्व तज्ञांनी एका सरोवरातून हजारो वर्षे जुन्या शस्त्रांचे अवशेष हस्तगत केले आहेत. या शोधाने इतिहासाची बंद पाने खुली होऊ शकतात. सरोवरातून बाहेर काढण्यात आलेली ही शस्त्रास्त्रs या देशाच्या पहिल्या राजाची असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. याचमुळे त्यांचे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरू शकते. लेडनिका येथील प्रथम पियास्ट संग्रहालयाने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या शोधाची घोषणा केली. ज्या सरोवरात ही पुरातन शस्त्रास्त्रs मिळाली आहेत, ते ओस्ट्रो लेडनिकी बेटाला घेरून असून हे 10 व्या शतकाच्या उत्तरार्धात एक विशाल शाही गड म्हणून ओळखले जात होते.

145 कुऱ्हाडी, 64 भाले अन् 8 तलवारी

Advertisement

शोधकर्त्यांना या सरोवरातून सुमारे 280 शस्त्रास्त्रs मिळाली आहेत. यात 145 कुऱ्हाडी, 64 भाले आणि 8 तलवारी सामील आहेत. टोरून येथील निकोलस कोपर्निकस विद्यापीठाच्या संशोधकांनी लेडनिका येथील प्रथम पियास्ट संग्रहालयाच्या मदतीने या शस्त्रास्त्रांचा शोध लावला आहे.

या शासकांची शस्त्रास्त्र

ही शस्त्रास्त्रs मिएज्को प्रथम आणि बोलेस्लाव द ब्रेवच्या काळातील आहेत. जे मध्यकालीन पोलंडच्या निर्माणात दोन महान व्यक्तिमत्त्वं होती. बहुधा सरोवरातून मिळालेली शस्त्रास्त्रs त्यांचीच होती. लेडनिका सरोवराने दशकांपासून वैज्ञानिकांना चकित केले आहे आणि शस्त्रास्त्रs या स्थळाच्या स्थायी रहस्याला आणखी वाढवत असल्याचे संग्रहालयाचे संचालक आंद्रेज कोवालचिक यांनी म्हटले आहे.

शस्त्रास्त्रांवर करण्यात आलेली विस्तृत कलाकुसर तसेच ते ज्या मूल्यवान धातूंनी निर्माण करण्यात आले होते, ते पाहता त्यांचा वापर उच्च कुलाच्या योद्ध्यांकडून करण्यात आला होता असे संकेत मिळतात. सजविण्यात आलेल्या सॉकेटयुक्त भाल्याचे टोक उत्तर आणि पूर्व युरोपमध्ये प्रारंभिक मध्ययुगीन शस्त्रांची असाधारण उदाहरणे आहेत, असे कोवालचिक यांनी सांगितले.

उत्तम स्थितीत शस्त्रास्त्र

अशाप्रकारची तीन उदाहरणे 1990 च्या दशकात लेडनिका सरोवरात आढळून आली होती. परंतु रंगीत मिश्र धातूंनी निर्मित सॉकेटने सुसज्ज अशी कुठलीच वस्तू आतापर्यंत मिळाली नव्हती. सर्वात रोमांचक शोध राजसी भाला होता, जो असाधारण स्वरुपात चांगल्याप्रकारे संरक्षित होता. स्टीलचे ब्लेड किंवा पातं एक जटिल स्वरुपात अलंकृत सॉकेटमध्ये लावलेले आहे, ज्यात अद्यापही शाफ्टचा एक तुकडा अस्तित्वात असल्याचे कोवालचिक यांचे सांगणे आहे. विशेष अध्ययनातून याच्या पृष्ठभागाचा बहुतांश भाग सोने, चांदी आणि कांस्यसोबत अन्य मिश्र धातूंनी आच्छादलेला असल्याचे कळते. यात परस्परांमध्ये रुतलेल्या आकृतीही आहेत. त्यांचे टोकदार शीर पंजे किंवा चोचीप्रमाणे दिसते आणि याचबरोबर छोट्या छोट्या बिंदूंच्या रांगेच्या पॅटर्नची पार्श्वभूमी तयार करते.

सरोवरात का फेकण्यात आली शस्त्रास्त्र

सरोवरात ही शस्त्रास्त्रs का सोडण्यात आली, यामागे दोन कारणे असू शकतात. पहिल्या सिद्धांतानुसार लेडनिका गडावर कब्जासाठी झालेल्या युद्धांदरम्यान बहुधा 1030 च्या दशकात चेक ड्यूक ब्रेतिस्लॉसने पोलंडवर आक्रमण केले होते, तेव्हा ही शस्त्रास्त्रs सरोवरात टाकण्यात आली होती. दुसरीकडे संग्रहालयाने ख्रिश्चनायजेशनच्या प्रक्रियेदरम्यान शस्त्रास्त्रांना अनुष्ठानिक स्वरुपात पाण्यात भेटच्या स्वरुपात ठेवले असावे, असे मत व्यक्त केले आहे. अशाप्रकारच्या प्रथा प्राचीन काळापासून आणि पूर्ण युरोपमध्ये अनेक स्थानांवरून ज्ञात आहेत. पाण्याला मृतांच्या जगाचे द्वार मानले जायचे आणि त्यात मूल्यवान वस्तू फेकणे एक खोल प्रतिकात्मक अर्थ बाळगण्याचे कार्य होते.

राजा मिएज्कोचा बाप्तिस्मा

कोवालचिक यांनी पोलिश इतिहासात ओस्ट्रोव लेडनिकीच्या विशेष महत्त्वावर जोर दिला, ज्यात याच स्थानी बहुधा मिएज्को प्रथमचा बाप्तिस्मा झाला होता, असे वक्तव्य केले.

Advertisement
Tags :

.