For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हजारो मराठा बांधव सोलापूरमधून मुंबईच्या दिशेने रवाना; एमआयएम पक्षानेही दिला पाठिंबा

08:12 PM Jan 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
हजारो मराठा बांधव सोलापूरमधून मुंबईच्या दिशेने रवाना  एमआयएम पक्षानेही दिला पाठिंबा
Maratha Solapur
Advertisement

 छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडही सहभागी

सोलापूर प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, त्यांच्या याच आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सोलापुरातील हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे शनिवार (ता. २०) रवाना झाले आहेत. सोबतच वाहनांमध्ये राहण्याची आणि अन्नधान्य, पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे एकट्या सोलापुरातील हजारो मराठे मुंबईत दाखल होणार आहेत.

Advertisement

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटील हे जालन्यावरून निघाले असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजारो मराठे एकत्र आले. त्यानंतर सर्वजण एकत्रितरित्या छत्रपती संभाजी महाराज चौकांमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मराठ्या मराठा समाजाला नुसता पाठिंबा जाहीर न करता छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड चे मतीन बागवान व त्यांचे सहकारी या मोर्चात सामील झाले आहेत तर एमआयएम पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष फारुक शाब्दी व त्यांचे पदाधिकारी व सहकारी यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईकडे निघालेल्या या सर्व मराठा योध्याचा पहिला मुक्काम माढा तालुक्यातील अरण येथे होणार असून, रविवारी सकाळी पुढील वाटचालीस सुरुवात होणार आहे. हजारोच्या संख्येने निघालेला मराठा समाज हा पुढे लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये पोहोचेल जिल्ह्यामधून मोहोळ, पंढरपूर, माढा, करमाळा, मंगळवेढा आधीसह सर्व तालुक्यातून व शहरातून मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे. या आरक्षण मोर्चामध्ये रवी मोहिते, माऊली पवार, राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे, अमोल शिंदे, आनंद जाधव, नागेश ताकमोगे, बालाजी वानकर, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे मतीन बागवान, श्रीकांत डांगे, तात्या वाघमोडे, विजय पोखरकर, दत्तात्रय मुळे, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.