Solapur Crime | आंबे येथे हजार ब्रास वाळू, टिप्पर, जेसीबी जप्त
04:47 PM May 26, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
आंबे येथील नदीकाठ परिसरात वाळू उत्खनन
पंढरपूर : पंढरपूर शहर आणि तालुक्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात येत असून आंबे या परिसरात सुमारे १०० ब्रास वाळू आणि दोन टिपर, एक जेसीबी जप्त करण्यात आले आहेत.
सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर सोमवारी सकाळी कारवाई केली. रेंगे, हेंबाडे, हुलजंती व पोलीस नाईक शिंदे यांनी गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आंबे येथील नदीकाठ परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता वैभव नागणे याच्या वाळू रॅम्पवर दोन टिपरमध्ये वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी अंदाजे १०० ब्रास वाळूचा साठा आढळून आला असून अवैधरीत्या वाळू उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
कारवाई दरम्यान पोलीस पथकाने जेसीबी मशीन थांबविण्याचा प्रयत्न केला असता संबंधित जेसीबी चालक तसेच एका यारी ट्रॅक्टर चालकाने पोलीस पथकारा पाहून वाहनांसह घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी घटनास्थळी मिळून आलेली वाहने ताब्यात घेतली असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. यावेळी टिप्पर क्रमांक (बीआर ०२ जी ए ३१८८) तसेच चालक सिद्धू लाला कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच घटनास्थळावरून पळून गेलेल्या जेसीबीचा मालक नागेश आसबे (रा. गोपाळपूर) असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement
.