For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा, आंबेवाडीची हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली

10:52 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा  आंबेवाडीची हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली
Advertisement

सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी वर्गातून मागणी

Advertisement

वार्ताहर/हिंडलगा 

हिंडलगा, आंबेवाडी, सुळगा, मण्णूर भागातील मार्कंडेय नदीकाठी असलेली हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली असून आठवडा ओलांडला तरी पाण्याच्या पातळीत घट नाही. पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. मार्कंडेय नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी भात पेरणी व भात रोप लागवड करून पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कष्ट घेतले होते. सुऊवातीला योग्य वेळी पाऊस पडत गेल्याने शेतकरी वर्गातून समाधान होते. परंतु मागील आठवडाभर मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून मार्कंडेय नदीला महापूर आला आहे. त्यामध्ये राकसकोप धरणातील पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी वाढत गेल्याने शेतजमीन अद्याप पाण्याखाली आहे.शेतजमिनीतील पाण्याचा विसर्ग होण्यास मार्गच नसल्याने पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे या भागातील हजारो एकर शेतजमिनीत दुबार पेरणी करून पिके घ्यायचे म्हटल्यास खर्चाचे होणार आहे. शेतीकामासाठी मजुरीदेखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी प्रमाणात मिळत आहे. तरी शासनाने रोहयोसाठी नेमलेले कामगार शेतीकामासाठी जोडून दिल्यास शेती उत्पन्न वाढीस सुलभ होईल. यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने ओला दुष्काळ करावा, अशा मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Advertisement

सरकारने शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करावे

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात यावर्षी नुकसान झालेले आहे. या भागात सातत्याने पाऊस पडल्याने संपूर्ण भाग जलमय झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करावे.

- अशोक वाय. पाटील शेतकरी,सुळगा (हिं.)

शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम वाढवून द्यावी

सरकारने या भागातील नुकसान झालेल्या शेतीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी. ही भरपाई देत असताना भरपाईची रक्कम वाढवून द्यावी. यापूर्वी गुंठ्याला 20 ऊपये व एकरी 800 ऊपये दिल्याने शेतकऱ्याने लावलेल्या दोन कामगारांचा खर्च देखील निघू शकत नाही. यासाठी जास्तीत जास्त रक्कम वाढवून शेतकऱ्यांना संकटातून वाचवण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील सरकार दरबारी आवाज उठवून रक्कम वाढवून घ्यावी.

-रमाकांत यादो पावशे,चेअरमन कृषी पत्तीन सहकारी संघ, हिंडलगा 

Advertisement
Tags :

.