For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केल ते दादाचं आम्हाला सोडून गेले ; हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर

11:25 AM Jan 28, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केल ते दादाचं आम्हाला सोडून गेले   हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर
Advertisement

                             उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमानाच्या अपघातामुळं दुखःद निधन

Advertisement

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमानाच्या अपघातामुळं दुखःद निधन झाले आहे. महाराष्ट्र राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान विमानतळाजवळील शेतात कोसळले. या भीषण अपघातात विमानाने पेट घेतला आणि त्यात अजितदादांसह ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

आज अजितदादांच्या बारामतीमध्ये चार सभा होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते निघाले होते. या अपघातात पायलट आणि दोन सहाय्यकांचाही समावेश असल्याचे DGCA ने सांगितले आहे. विमानतळ प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू झाली आहे. एक धडाडीचा आणि प्रशासनावर पकड असलेला नेता आपण गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Advertisement

हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर

आपले जवळचे सहकारी गमावल्याचं दुःख काय असतं, हे आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या डोळ्यांत दिसलं. ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलं ते दादाच आम्हाला सोडून गेले असं म्हणताना मुश्रीफ यांना माध्यमांसमोर अक्षरशः अश्रू अनावर झाले.

Advertisement
Tags :

.