For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जाहिरात स्ट्रक्चरवर काळा पडदा घालण्यासाठी आलेल्यांना रोखले

01:12 PM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
जाहिरात स्ट्रक्चरवर काळा पडदा घालण्यासाठी आलेल्यांना रोखले
Advertisement

मनपा झोनल आयुक्तांकडून दखल : महसूल उपायुक्तांशी चर्चा करण्याची सूचना

Advertisement

बेळगाव : शहर व उपनगरातील अनधिकृत जाहिरात फलकांबाबत महापालिकांच्या बैठकामध्ये वारंवार जोरदार चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र आता मनपा आणि जाहिरात फलक ठेकेदारांमध्ये वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. कन्नड साहित्य भवन आवारातील जाहिरात फलक हटविण्यात आल्याने लोखंडी स्ट्रक्चरवर काळा पडदा लावण्यासाठी काहीजण आले होते. त्यांना झोनल आयुक्त अनिल बोरगावी यांनी रोखले. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. न्यायालयाच्या आदेशानुसार जाहिरात फलकांसाठी कर आकारण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे.

त्यामुळे जाहिरात फलकांच्या माध्यमातून महानगरपालिकेला मिळणारा महसूल बुडत चालला आहे. परिणामी शहर व उपनगरात जागा मिळेल त्याठिकाणी अनधिकृतरित्या जाहिरात फलक उभारले जात आहेत. यासाठी महानगरपालिकेकडून रितसर परवानगीही घेतली जात नाही. फलक हटविण्यासाठी गेले असता उलट संबंधितांकडून दादागिरी केली जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी अनधिकृतरित्या फलक उभारण्यात आले आहे ते हटविण्यात यावेत, अशी मागणी दरवेळच्या बैठकीत केली जाते. त्यामुळे आता ही बाब महानगरपालिकेकडून गांभीर्याने घेण्यात आली आहे. महसूल विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून विशेष मोहीम उघडण्यात आली आहे. महानगरपालिकेला कर न भरता जाहिरातदारांकडून मनमानी पद्धतीने पैसे उकळणारे ठेकेदार मात्र मालामाल होत आहेत. पण आता ठेकेदारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.

Advertisement

महसूल उपायुक्तांशी चर्चेनंतरच कोणतेही काम हाती घ्यावे

बहुतांश ठिकाणचे जाहिरात फलक हटविण्यात आले असून केवळ स्ट्रक्चर शिल्लक आहे. त्या स्ट्रक्चरवर काळा कपडा घालण्यासाठी ठेकेदार प्रयत्नशील आहेत. अशा प्रकारे बुधवारी कन्नड साहित्य भवन आवारातील स्ट्रक्चरवर काळा पडदा घालण्यासाठी आलेल्यांना झोनल आयुक्त अनिल बोरगावी यांनी रोखले. याबाबत महसूल उपायुक्तांशी चर्चा केल्यानंतरच स्ट्रक्चरवर कोणत्याही प्रकारचे काम हाती घेण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

Advertisement
Tags :

.