For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृत्यूनंतर ज्यांना वैकुंठलोक प्राप्त होतो त्यांचा पुनर्जन्म होत नाही

06:35 AM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
मृत्यूनंतर ज्यांना वैकुंठलोक प्राप्त होतो त्यांचा पुनर्जन्म होत नाही
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

पापावले मोक्ष-सिद्धीस महात्मे मज भेटुनी । दु:खाचे घर तो जन्म न घेती चि अशाश्वत ।। 15 ।।

हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.  त्यानुसार, माणसाला त्याच्या देहाचा अनिवार मोह असतो परंतु तसा तो होऊ नये ह्यासाठी मानवी देह हा कसा दु:खदायक असतो हे सांगताना माउली म्हणतात, माणसाचे शरीर म्हणजे दु:खरूप झाडांची बाग व त्रितापरूपी विस्तवाची शेगडी आहे. त्याचा शेवट दु:खदायक मरणात होतो. त्यामुळे ते सर्व दु:खांसाठी पुरेसे भांडवल आहे. ते सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे.

Advertisement

ते म्हणजे मूर्तिमंत आशा असून जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे. जे भ्रमाने भरलेले व संशयाने ओतलेले असून विंचवाचे पेव आहे, ते वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे, जे विषयांचा अनुभव करून देणारे सुपूजित यंत्रच आहे.

ते विषाचा घोट असून सावाचे

सोंग घेतलेल्या चोरावर विश्वास

ठेवल्यावर होणाऱ्या घाताप्रमाणे आहे. ते रक्तपित्याचे आलिंगन असून हटकून मरण आणणाऱ्या सापाचा मऊपणा आहे.

ते शत्रूने केलेल्या पाहुणचाराप्रमाणे आहे. थोडक्यात ते सर्व अनर्थांचा समुद्र आहे. माणसाचे शरीर हा एक भास आहे आणि भास हा नेहमीच माणसाला चकवा देत असतो. त्यामुळे जे कधीही घडणे शक्य नाही ते घडेल अशी अपेक्षा तो आयुष्यभर करत असतो.

उदाहरणार्थ स्वप्नात पाहिलेले स्वप्न अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान किंवा धुराच्या कणांचे बनविलेले आकाश ह्या गोष्टी जशा अशक्यप्राय आहेत.

त्याप्रमाणे माणसाचे शरीर त्याचे भले करेल ही केवळ खोटी समजूत आहे. असे हे दु:खाचे निकेतन असलेले मानवी शरीर माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेल्या भक्तांना पुन्हा प्राप्त होत नाही.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, ब्रह्मलोकासकट सर्व लोकांचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत परंतु माझ्यापर्यंत जे येतात त्यांना पुनर्जन्म मिळत नाही.

ब्रह्मादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा । माझी भेट घडे तेंव्हा जन्मणे मग खुंटले ।।16।।

आपल्याला स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ असे तीन लोक माहित आहेत. पृथ्वीवर जे लोक पुण्यकर्म करतील ते मृत्यूनंतर स्वर्गात जातात आणि पाप करणारे नरकात जातात असे आपण समजतो. त्यादृष्टीने स्वर्गलोक प्राप्त व्हावा म्हणून आपली खटपट चालू असते. त्या स्वर्गाच्याहीवर इतर देवतांचे लोक असतात.

जे ज्या देवाची आराधना निरपेक्षतेने करतात त्यांना त्या त्या देवांचे लोक प्राप्त होतात. सगळ्यात वर ब्रह्मदेवाचा सत्यलोक आहे. सत्यलोकासकट सगळ्या लोकाबद्दल असे सांगता येईल की, ह्यापैकी कोणत्याही लोकात पोहोचलेल्या पुण्यवान मनुष्याचा पुण्यासाठा संपला की, त्याचा पृथ्वीवर पुनर्जन्म होतो. फक्त जे भगवंतांची निरपेक्ष भक्ती करतात, इंद्रियांना ताब्यात ठेवून त्यांच्या इच्छांना आवर घालून, अधियज्ञाच्या मार्फत स्वत:चे सर्वस्व म्हणजे अहंकार भगवंतांना अर्पण करतात त्यांना वैकुंठलोक प्राप्त होतो. त्यांचा मात्र पुनर्जन्म होत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.