For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॉल सेंटर प्रकरणातील ‘त्या’ आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी

01:10 PM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
कॉल सेंटर प्रकरणातील ‘त्या’ आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी
Advertisement

बेळगाव : अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईनद्वारे गंडा घालणाऱ्या बेळगावातील एका कॉल सेंटरवर छापा टाकून सीसीबी पोलिसांनी 33 जणांना अटक केली होती. त्या सर्वांना शुक्रवार दि. 14 रोजी तृतीय जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आल्याने न्यायालयाने सर्वांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बॉक्साईट रोडवरील गेल्या काही महिन्यांपासून एका खासगी इमारतीत कॉल सेंटर सुरू करण्यात आले होते.

Advertisement

त्या ठिकाणी उत्तरप्रदेश, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळसह इतर राज्यातील 33 जण पगारावर काम करीत होते. त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेषकरून हे सर्वजण अमेरिकेतील नागरिकांना फसवत होते. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना मिळाल्यानंतर सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान अवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून सर्वांना शुक्रवारी तृतीय जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. सदर प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने अधिक तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलीस व सरकारी वकिलांनी केल्यामुळे न्यायाधीश पल्लवी पाटील यांनी सर्वांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Advertisement
Advertisement
Tags :

.