For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थॉमस, उबेर चषक स्पर्धा आजपासून

06:16 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
थॉमस  उबेर चषक स्पर्धा आजपासून
Advertisement

भारतीय पुरुष संघासमोर जेतेपद राखण्याचे आव्हान

Advertisement

वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन)

भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू थॉमस चषकाचे विजेतेपद राखण्यासाठीच्या खडतर प्रवासाला आज शनिवारपासून सुरुवात करताना सातत्यपूर्ण कामगिरी करू पाहतील, तर पी. व्ही. सिंधूशिवाय खेळणारा युवा महिला संघ उबेर चषकातील मोहिमेला सुरुवात करताना आपल्या ताकदीपेक्षा जास्त झेप घेण्याचे ध्येय बाळगून असेल.

Advertisement

दोन वर्षांपूर्वी पुरुषांसाठीची सांघिक गटातील जागतिक स्पर्धा मानल्या जाणाऱ्या थॉमस चषक स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करून भारताने बॅडमिंटन जगताला धक्का दिला होता. अपेक्षांच्या ओझ्याशिवाय खेळणाऱ्या भारताने खेळाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व अध्याय लिहिताना जगातील सर्वोत्तम संघांना पराभूत केले होते. आता ते 33 व्या स्पर्धेत परतले आहेत आणि पुन्हा एकदा सर्वोच्च संघांविऊद्ध आपले सामर्थ्य दाखविण्याचे कठीण आव्हान त्यांच्यासमोर आहे.

भारताला ’ग्रुप ऑफ डेथ’मध्ये म्हणजे अनेक वेळचे विजेते इंडोनेशिया, थायलंड आणि इंग्लंड यांच्यासह ‘क’ गटात समावेश करण्यात आला आहे. भारतीय पुरुष थायलंडविऊद्धच्या लढतीने त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील, पण सर्वात मजबूत प्रतिस्पर्धी तिसरा मानांकित इंडोनेशिया असेल. भारतातर्फे एच. एस. प्रणॉय हंगामाच्या पहिल्या सहामाहीत संघर्ष केल्यानंतर या स्पर्धेत उतरत आहे. फ्रंsच ओपन आणि ऑल इंग्लंड स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या लक्ष्य सेनला वेळेत सूर गवसलेला आहे, तर 2022 मध्ये सर्व सहा सामने जिंकलेल्या किदाम्बी श्रीकांतची गेल्या दोन वर्षांतील वाटचाल संमिश्र राहिलेली आहे.

तिसऱ्या एकेरी सामन्याची जबाबदारी तऊण प्रियांशू राजावतवर सोपविली जाऊ शकते. सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी वर्ल्ड टूरवर सलग चार स्पर्धांची अंतिम फेरी गाठलेली असून भारताचे प्रमुख खेळाडू म्हणून या जोडीकडे पाहावे लागेल. ध्रुव कपिला आणि अर्जुन एम. आर. दुसरी दुहेरी लढत खेळतील. उबेर चषकामध्ये अस्मिता चालिहा एका तऊण भारतीय संघाचे नेतृत्व करेल. ‘अ’ गटात भारताचा समावेश असून कॅनडाविऊद्धच्या लढतीने मोहिमेची सुऊवात केली जाईल. अव्वल मानांकित चीन आणि सिंगापूर हे देखील त्यांच्या गटात आहेत,

Advertisement
Tags :

.