For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थॉमस-उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा 27 एप्रिलपासून

06:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
थॉमस उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा 27 एप्रिलपासून
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

चीनमधील चेंगडू येथे 27 एप्रिलपासून विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थॉमस-उबेर चषक सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होत आहे. मात्र या स्पर्धेत भारताची दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूसह अन्य चार बॅडमिंटनपटूंनी माघार घेतली आहे. दीर्घकालीन दुखापतीनंतर बॅडमिंटन क्षेत्रात पुनरागमन करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने 2024 च्या बॅडमिंटन हंगामात आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शविला. गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत सिंधूने पुनरागमन केले होते. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिंम्पिक स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी तसेच पूर्ण तंदुरुस्ती राखण्याकरिता सिंधूने उबेर चषक स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 27 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या महिला दुहेरीतील अव्वल दोन जोड्या भाग घेणार नाहीत. त्रीसा जॉली आणि गायत्री गोपिचंद तसेच अश्विनी पोनप्पा व तनिषा क्रॅस्टो यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारताने या स्पर्धेत गेल्यावेळी दर्जेदार कामगिरी करत पहिल्यांदा थॉमस चषकावर आपले नाव कोरले असल्याने विद्यमान विजेत्या भारताला हे जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.

Advertisement
Advertisement
Tags :

.