100 अपत्यांचा पिता झालाय हा युवक
विश्वविक्रम नोंदविण्याच्या समीप
अमेरिकेत राहणारा 32 वर्षीय काइल गॉर्डी आतापर्यंत 100 अपत्यांचा पिता झाला आहे. हे विचित्र वाटत असले तरीही सत्य आहे. यामागील कहाणी काही औरच आहे. काइल गॉर्डी जगातील सर्वात प्रसिद्ध स्पर्म डोनर आहे. आतापर्यंत तो जगभरात 87 मुलांचा जैविक पिता झाला आहे. तर 2025 च्या प्रारंभी त्याला त्याचा परिवार आणखी मोठा होणार असल्याचे कळले. तो आता 100 मुलांचा पिता होण्याच्या मार्गावर आहे.
आगामी महिन्यांमध्ये कॅलिफोर्नियात राहणाऱ्या काइलच्या मुलांची संख्या 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हा विक्रम आतापर्यंत केवळ तीन अन्य पुरुषांनी केला आहे, परंतु या ऐतिहासिक पल्ल्यापर्यंत पोहोचल्यावर काइने स्पर्म डोनेट बंद करण्याचा विचार बाळगलेला नाही.
मिळतो आनंद
इतक्या सर्व मुलांचा पिता होणे एक चांगला अनुभव आहे. मातृत्व शक्य नसल्याचा विचार करणाऱ्या महिलांना परिवार सुरू करण्यास मदत केल्याचा मला आनंद आहे. परंतु मी जगाच्या लोकसंख्येवर कुठलाही मोठा प्रभाव पाडण्यापासून अद्याप खूपच दूर आहे आणि याचमुळे मी सध्या केवळ सुरुवात करत आहे. खरं सांगायचे झाल्यास माझ्याकडे मुलांची कुठल्याही निश्चित संख्येचे लक्ष्य नाही. जोपर्यंत स्पर्म डोनेशनची गरज भासेल तोपर्यंत मी मुलांचा पिता होत राहणार असल्याचे काइलने म्हटले आहे.
काइलचा सेवाभाव
काइल ‘बी प्रेग्नंट नाऊ’ नावाच्या वेबसाइटद्वारे मोफत स्वरुपात सेवा प्रदान करतो. सध्या इंग्लंड, स्कॉटलंड, स्वीडन आणि नॉर्वेत तो 14 मुलांचा पिता होणार आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर 3 हजाराहून अधिक फॉलोअर्स असून तो स्वत:च्या सेवांसाठी संपर्क करणाऱ्यांना मदत करत असतो.
90 डे फियांसेपासून जागतिक प्रवासापर्यंत
काइल हा लोकप्रिय शो ‘90 डे फियांसे’मध्येही दिसून आला. आता तो जगभरात प्रवास करत अनोखी सेवा प्रदान करत आहे. परंतु त्याचे वैयक्तिक जीवन स्थिर राहिलेले नाही. शोमधील अनिका फिलिपसोबतचे त्याचे नाते संपुष्टात आले आहे. जगभरातील काही ठिकाणी प्रवास करायचा आहे. मी जपान आणि आयर्लंडमध्ये काही महिलांशी बोलत आहे. या दोन्ही देशांमध्ये मी स्पर्म डोनेशन केलेले नाही. याचबरोबर ब्रिटन, अमेरिका आणि युरोपच्या अन्य देशांचीही योजना असल्याचे त्याचे सांगणे आहे.
आयर्लंडलबद्दल आत्मियता
काइल हा आयर्लंडवर मनापासून प्रेम करतो. तसेच तो एका आयरिश पत्नीची इच्छा बाळगून आहे. तसेच तो तेथेच स्थायिक होण्याचा विचार करत आहे. तो अनेकदा तेथे गेला असून तेथील अनुभव त्याला अत्यंत पसंत आहे.