For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा आगळा-वेगळा

06:12 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
यंदाचा प्रजासत्ताक दिन  सोहळा आगळा वेगळा
Advertisement

परेडमध्ये फ्रान्स लष्कराची तुकडी सहभागी होणार : संचलनात महिलांचा सहभागही वाढणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2024 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर भारतीय सैन्याची भव्य परेड आयोजित करण्याची परंपरा आहे. परेडदरम्यान जगाला भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, एकता आणि प्रगतीचा भव्य देखावा पाहायला मिळेल. तसेच यंदाच्या परेडमध्ये फ्रान्समधील 95 जवानांचे पथक आणि 33 जणांची बँड तुकडी सहभागी होत आहे. सध्या हे पथक दिल्लीत दाखल झाले असून ह्या तुकड्या विजय चौकात परेडची जोरदार रंगीत तालीम करत आहेत. फ्रेंच हवाई दलाचे राफेल लढाऊ विमान आणि मल्टीरोल टँकर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट देखील परेडमध्ये प्रदर्शित केले जातील. विदेशी जवानांच्या संचलनाबरोबरच भारतीय सुरक्षा दलातील महिलांच्या तुकड्यांचा सहभागही वाढवण्यात आला असल्याने यंदाच्या परेडला आगळा-वेगळा साज चढणार असल्याचे दिसत आहे.

Advertisement

यावषी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मेड इन इंडिया शस्त्रे आकर्षणाचे मुख्य केंद्र असतील. परेडदरम्यान एलसीएच प्रचंड हेलिकॉप्टर, पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र नाग यांसारखी स्वदेशी शस्त्रे प्रदर्शित केली जातील. टी-90 रणगाडे, बीएमपी-2 इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल, ड्रोन जॅमर, प्रगत ऑल-टेरेन ब्रिज, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि मल्टी-फंक्शन रडार इत्यादी स्वदेशनिर्मित शस्त्रे देखील प्रदर्शित केली जातील.

महिला लढाऊ वैमानिकांचाही समावेश

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिला लढाऊ वैमानिकांचाही समावेश करण्यात आला आहे. या परेडमध्ये 48 महिला अग्निवीरही सहभागी होत आहेत. यासोबतच भारतीय वायुसेनेची एकूण 51 विमाने या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. या 51 विमानांमध्ये 29 लढाऊ विमाने, आठ वाहतूक विमाने आणि 13 हेलिकॉप्टरचा समावेश असेल. एलसीए तेजस देखील पहिल्यांदाच प्रजासत्ताक परेडमध्ये सहभागी होणार आहे. तेजस वर्गातील चार विमाने उ•ाण करण्याबरोबरच सी-295 विमानही प्रथमच सहभागी होणार आहे. या परेडमध्ये भारतीय हवाई दल टँगोल एअरड्रॉप देखील दाखवेल. या विमानाद्वारे 1971 मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

13,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण

परेडमध्ये सहभागी होणाऱ्या सैनिकांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. महिलांच्या भूमिकेवर सरकारने महत्त्वपूर्ण विधान केले आहे. यंदाची परेड आजवरची सर्वात महिला-केंद्रित परेड असेल, असे संरक्षण सचिव गिरधर अरमाने यांनी सांगितले. यावषी, प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची थीम ‘विकसित भारत’ आणि ‘भारत-लोकशाहीची जननी’ ही ठेवण्यात आली आहे. प्रथमच 100 महिला कलाकारांच्या सादरीकरणाने परेड सुरू होईल. भारतीय वाद्ये वाजवणारी ही टीम परेडच्या सुरुवातीला शंख, नादस्वरम, नगारा या वाद्यांसह कर्तव्य मार्गावर पोहोचेल, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. केंद्र सरकारने कर्तव्य मार्गावर प्रजासत्ताक दिन परेड 2024 चे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 13,000 विशेष अतिथींनाही आमंत्रित केले आहे.

Advertisement
Tags :

.