कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यंदा अधिवेशनामुळे शैक्षणिक सहली लवकर

12:25 PM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शाळांकडून नियोजन ; परवानगीसाठी धडपड : परिवहन मंडळाकडे बससाठी चौकशी 

Advertisement

बेळगाव : दिवाळीनंतर पुन्हा शाळा सुरू झाल्या असून आता विद्यार्थी, तसेच शिक्षकांना सहलींचे वेध लागले आहेत. सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांच्या सहलींचे नियोजन सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यात बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सहली नेण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, तसेच काही शाळा जानेवारी महिन्यात सहली घेऊन जातात. यासाठी परिवहन मंडळ, खासगी बस अथवा इतर वाहनांची सोय केली जाते. परिवहन मंडळाने सहलीसाठी दर निश्चिती केली आहे. कर्नाटकसह इतर राज्यातही सहलींचे नियोजन आखले जाते.

Advertisement

तब्बल चार ते पाच दिवस सहली काढल्या जातात. काही इंग्रजी माध्यम शाळा दिल्ली, हिमाचल प्रदेश, केरळ, कन्याकुमारी अशा लांबपल्ल्याच्या सहलीदेखील काढतात. यावर्षी 8 डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. यादरम्यान परिवहन मंडळाच्या अतिरिक्त बसेस अधिवेशनाच्या बंदोबस्त, तसेच इतर कामांमध्ये व्यस्त असतात. 15 दिवस अधिवेशन चालत असल्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत ते चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी सहली काढण्याचा विचार शाळांकडून सुरू आहे. सहलींसाठी अवघे 20 ते 25 दिवस मिळत असल्यामुळे शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. पालकांकडून संमतीपत्र घेण्यासोबत परिवहन मंडळाला अॅडव्हान्स देणे, तसेच त्याची पावती जोडून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळविण्यासाठी शिक्षकांची धांदल सुरू आहे.

परिवहन मंडळाच्या बसचीच सक्ती...

यापूर्वी राज्यात सहलीदरम्यान खासगी बसला झालेल्या अपघातानंतर परिवहन मंडळाच्याच बसची सक्ती करण्यात आली आहे. राज्यांतर्गत सहल काढायची असेल तर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे परवानगी घ्यावी लागते. राज्याच्या बाहेरील सहलीसाठी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे सक्तीचे आहे. परिवहन मंडळाकडून अॅडव्हान्स पावती मिळाल्यानंतरच शिक्षण विभागाकडून परवानगी दिली जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article