यंदा कित्तूर उत्सव जागतिक पातळीवर
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती : कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी सभा
बेळगाव : राणी कित्तूरच्या चन्नम्मा विजयोत्सव 200 हा वर्धापन दिन साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा कित्तूर उत्सव जागतिक पातळीवरील कार्यक्रम म्हणून अति उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व सज्जता करून घ्याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. कित्तूर येथील शेट्टर कल्याण मंडपामध्ये मंगळवारी आयोजित कित्तूर उत्सवाच्या पूर्वतयारी सभेच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. ते म्हणाले यावेळी चित्तूर चन्नम्मा विवोत्सवाचा 200 वा वर्धापन दिन असून देशातील विविध राज्यातील आहार पद्धतीचा परिचय करून देण्यासाठी अन्नोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी उत्सवाच्या स्मरणार्थ राणी चन्नम्मा यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट काढण्यासाठी सरकारला केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे नाव कित्तूर कर्नाटक परिवहन संस्था असे नामकरण करण्यासाठी तसेच राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाच्या बदली कित्तूर राणी चन्नम्मा विश्वविद्यालय असे फेरनामकरण करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावेळी मिरवणुकीमध्ये केवळ नंदी ध्वजाला अनुमती देण्यात आली आहे. 23 ऑक्टोबर पासून 3 दिवस होण्राया या उत्सवांमध्ये राज्य पातळीवरील कलाकारांसोबत राष्ट्रीय कलाकारांनाही अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.
एअर शो आयोजनासाठी क्रम
यावेळी कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने एअरशोचे आयोजन करण्याबाबत केंद्रीय संरक्षण सचिवालयाशी संपर्क साधला आहे. याबाबत संमती मिळेल अशी आपल्याला खात्री असल्याचेही मोहम्मद रोशन यांनी सांगितले. उत्सवाच्या निमित्ताने पारंपारिक क्रीडांचे आयोजन करण्याबाबत क्रीडा प्रकारांची यादी सिद्ध करण्यात आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्तीचे आयोजनही करण्याचा विचार सुरू आहे. कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी बोलताना यावेळी कित्तूर उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार असून सर्व तयारी करण्यास येत आहे. यावेळी युवा अधिक्रायांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्साहाने हा उत्सव साजरा करण्याची सिद्धता करण्यात आली आहे. यावेळी उत्सवांमध्ये कोणताही कोणतेही लोपदोष राहू नयेत यासाठी सर्व तयारी करण्यात येत आहे.
उत्सव यशस्वीतेसाठी सार्वजनिकांनी सहभागी होणे व जबाबदारी पार पडणे महत्त्वाचे आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन केले. दिव्य सानिध्य भूषवून बोलताना कल्मठचे राजगुरू संस्थान मठाचे मडिवाळ राजयोगेंद्र स्वामीजी यांनी यावेळी विजयोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करण्यासाठी सरकारसोबत सार्वजनिकांनी जबाबदारी पार पाडावी. यावेळचा उत्साह स्मरणीय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सभेस जिल्हा पंचायतीचे मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेश कुमार, बैलहोंगलच्या उपविभागीय अधिकारी प्रभावती फकीरपुर, बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रवण नायक, चिकोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व सार्वजनिक उपस्थित होते.
सार्वजनिकांच्या सल्ला सूचना
कित्तूर उत्सवांमध्ये कवी गोष्टींचे आयोजनासोबत महिलांसाठी व पुऊषांसाठी स्वतंत्र कवी संमेलनाचे आयोजन, 200 वर्षाच्या उत्सवाच्या निमित्ताने 200 साधकांची करून निवड करून त्यांचा सन्मान, मल्लसर्जा यांच्या पुतळ्याची निर्मिती, कित्तूर राजकारभाराशी संबंधित स्मारकांचे संरक्षण, उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये पोलीस बँड व मराठा लाईफ इन्फंट्री बँडचे प्रदर्शन करून हा उत्सव साजरा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.