ऑटो क्षेत्रासाठी आठवडा महत्त्वाचा...नव्या कार्सचे होणार लाँचिंग
मुंबई :
15 ते 21 डिसेंबर या कालावधीत ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठ्या हालचाली पहायला मिळाल्या आहेत. टाटा मोटर्स, एमजी मोटर इंडिया आणि निस्सान या कंपन्या सदरच्या आठवड्यात एसयूव्ही, एमपीव्ही गटामध्ये आपल्या नव्या कार्स सादर करणार आहेत.
नवी सीएरा
काही कंपन्या आपल्या कारचे बुकिंग सुरु करणार असून काही कंपन्या आपली नवी मॉडेल्स सादर करणार आहेत. टाटा सिएरा या गाडीचे बुकिंग मंगळवार दि. 16 डिसेंबरपासून अधिकृतरित्या सुरु होणार आहे. या आधी टाटा विक्रेत्यांकडून 21 हजार रुपये आगाऊ भरून घेत सदरच्या गाडीचे प्री बुकिंग केले जात आहे. सदरच्या गाडीचे वितरण 15 जानेवारीपासून करण्याचे नियोजन आहे. सीएरा ही गाडी तीन इंजिन पर्यायासह जसे की, 1.5 लिटर हायपरियन टी-जीडीआय पेट्रोल, 1.5 लिटर रिव्होट्रोन एनए पेट्रोल आणि 1.5 लिटर क्रायोजेट डिझेल यासह कार्स सादर केल्या जातात. एकंदर 7 गाडींचे प्रकार सादर केले जाणार आहेत. या गाडीची सुरुवातीची किंमत 11.49 लाख रुपये (एक्स शोरुम) असेल. 29.9 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज सदरची गाडी देणार असल्याचे समजते.
नवी हेक्टर
याच दरम्यान एमजी मोटर इंडिया यांची नवी हेक्टर 2026 ही कार जागतिक स्तरावर सादर केली जाणार आहे. कंपनीने आपल्या टिझरमध्ये यासंबंधी पुष्टी दिली आहे. सध्याला हेक्टरची विक्री दबावामध्ये दिसून आली आहे. नोव्हेंबरमध्ये 278 गाड्यांची विक्री झाली आहे. येणाऱ्या काळात हेक्टरमध्ये बाह्या डिझाईनमध्ये मोठा बदल केला जाणार असून एलईडी लायटिंग व अधिक गडद फ्रंट डिझाईन दिले जाणार आहे. 1.5 लिटर टर्बो पेट्रोल व 2.0 लिटर डिझेल इंजिनसह येणाऱ्या या गाडीची किंमत 14 लाख ते 19.99 लाख रुपये (एक्स शोरुम) राहणार आहे.
निस्सानही तयारीत
याच दरम्यान निस्सानदेखील एमपीव्ही गटामध्ये आपली नवी गाडी 18 डिसेंबरला सादर करणार आहे. रेनॉ ट्रिबरच्या प्लॅटफॉर्मवर नवे मॉडेल, नव्या डिझाईन आणि अंतर्गत बदलासह तयार करण्यात आले आहे. यासोबतच टेक्टटॉन ही एसयुव्ही गटातील एक व एक 5 जण बसतील अशी मोठी कारदेखील सादर करणार आहे. मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्स, एलईडी लाइटिंग, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसहचा टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशा सुविधा सदरच्या कार्समध्ये दिल्या जाणार आहेत.