3 हजार फुटांवर आहे हा खडक
वेगळ्याच जगाची होते अनुभूती
ट्रोलटुंगा नॉर्वेच्या सर्वात शानदार टेकड्यांपैकी एक आहे. हे समुद्रसपाटीपासून सुमारे 1100 मीटर उंचीवर आहे. येथील खडक रिंगेडल्सवाटनेट सरोवरापासून सुमारे 700 मीटर उंचीवर आहे, ज्यावरून लोकांना जगातील अत्यंत सुंदर दृश्य पहायला मिळते. तेथे पोहोचून त्यांना एका वेगळ्याच जगाची अनुभूती होते. आता तेथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या खडकावरून अत्यंत सुंदर नैसर्गिक दृश्य दिसते, उंच पर्वत, दूरपर्यंत वाहणारे पाणी, ढगांनी आच्छादलेले आकाश आणि चहुबाजूला सूर्यकिरणांमुळे निर्माण झालेला प्रकाश येथून पाहणे आल्हाददायी असते. एकदा हे ठिकाण पाहिल्यावर याचा लोकांना कधीच विसर पडू शकत नाही. ट्रोलटुंगा खडकावर पोहोचल्यावर लोकांना रिंगेडल्सवाटनेट सरोवर आणि फोल्गेफोना ग्लेशियरचे अद्भूत दृश्य दिसून येते. ट्रोलटुंगा जगातील सर्वाधिक छायाचित्रे काढल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. येथील असंख्य छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे ठिकाण हायकिंगचे सर्वोत्तम ठिकाण आहे.