या महिन्यात ‘टेस्ला’ची टीम भारत भेटीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एलॉन मस्कची इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादक कंपनी टेस्ला या महिन्यात भारतात एक टीम पाठवणार आहे. जी 16 हजार कोटी ते 25 हजार कोटी किमतीच्या इलेक्ट्रिक कार निर्मिती प्रकल्पासाठी जागा शोधणार असल्याची माहिती आहे. fिब्रटनच्या फायनान्शियल टाइम्सने आपल्या एका वृत्तात ही माहिती दिली आहे.
प्राप्त अहवालानुसार, इलेक्ट्रिक कार निर्मिती प्रकल्पासाठीचे लक्ष महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू सारख्या ऑटोमोटिव्ह केंद्र असणाऱ्या राज्यांवर राहणार आहे. काही वाहन उत्पादकांचे हरियाणातही
कारखाने आहेत, परंतु टेस्लाचे कारखाने इतर तीन राज्यांमध्ये राहणार आहेत. याचे कारण म्हणजे या राज्यांची बंदरे, जिथून कार निर्यात करणे सोपे होणार आहे.
सरकारच्या नवीन ईव्ही धोरणाला हिरवा कंदील
सरकारने 15 मार्च रोजी नवीन ईव्ही धोरणाला मंजुरी दिली होती.
टेस्लाच्या भारतात प्रवेशाची ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा केंद्र सरकारने भारताला इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचे केंद्र बनवण्यासाठी आपल्या नवीन ईव्ही धोरणाला मंजुरी दिली आहे.
नवीन धोरणामध्ये कंपन्यांनी किमान 4150 कोटींची गुंतवणूक करण्याची तरतूद आहे आणि कमाल गुंतवणुकीवर मर्यादा मात्र ठेवण्यात आलेली नाही.