महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हा क्षण माझ्यासाठी आनंदाचा : कामत

12:25 PM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शेवटच्या क्षणी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद देण्याची हमी देण्यात आली होती. त्याची पुर्तता होत असल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी हा क्षण आपल्यासाठी आनंदचा असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. काल जेव्हा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हा आमदार दिगंबर कामत हे थेट नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या घरी पोचले व त्यांनी आलेक्स सिक्वेरा यांचे अभिनंदन केले. गेले वर्षे भर आलेक्स सिक्वेरा हे मंत्रीपदाची वाट पहात होते. काँग्रेसमधून सात जणाचा गट बाहेर पडण्यासाठी सज्ज झाला तेव्हा पक्षांतर बंदी कायद्यातून सुटका होण्यासाठी आठव्या आमदाराची गरज होती. अशावेळी आलेक्स सिक्वेरा हे मंत्रीपद मिळत असल्यास या गटात सामील होण्यास राजी झाले व त्यांना तशी हमी मिळाल्यानंतरच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद मिळावे यासाठी स्व:ता दिगंबर कामत हे पुढाकार घेत होते. कारण त्यांच्या शब्दासाठी आलेक्स सिक्वेरा हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article