For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हे पदक सर्वांना अर्पण !

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
हे पदक सर्वांना अर्पण
Advertisement

ऑलिम्पिक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे, पुण्यात जंगी स्वागत, शिवछत्रपती क्रीडा संकुलात जाहीर सत्कार

Advertisement

पुणे : मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. हे यश माझ्या एकट्याचे नसून माझे कुटुंबीय, माझे गुऊ, प्रशिक्षक, मला ज्यांनी ज्यांनी मदत केली, मित्र मंडळी, प्रायोजक अशा सर्वांचे आहे. हे पदक मी या सर्वांना अर्पण करतो, अशा भावना ऑलिम्पीक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याने गुऊवारी पुण्यात व्यक्त केल्या. कुसाळे याचे गुऊवारी पुण्यात जंगी स्वागत करीत जाहीर सत्कार करण्यात आला. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर स्टेडीयममध्ये झालेल्या कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यात आला.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडाआयुक्त डॉ.राजेश देशमुख, ऑलिम्पीक ज्युरी पवन सिंह, स्वप्नील यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, आई अनिता कुसाळे, वडील सुनील कुसाळे, अक्षय अष्टपुत्रे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी देत यावेळी स्वप्नील यांचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दूरध्वनीवरून संपर्क साधत स्वप्नील यांचे अभिनंदन केले.

Advertisement

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 1952 नंतर 2024 साली स्वप्नीलच्या रूपाने महाराष्ट्राचा ऑलिम्पीक पदकाचा दुष्काळ संपला आहे. आई वडिलांचे श्र्रम स्वप्नीलच्या या पदकाने सत्कारणी लागले आहेत. त्याच्या यशात गुऊ दिपाली देशपांडे यांचाही मोलाचा वाटा आहे. स्वप्नीलच्या आई वडिलांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि आम्हा सर्वांचा विश्वास स्वप्नीलने सार्थ ठरविला याचा आम्हाला अभिमान आहे. 2012 साली अंगकाठीने अगदी लहान असलेला स्वप्नील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीत दाखल झाला होता, आज ऑलिम्पीक पदक जिंकून आलेल्या स्वप्नीलची भव्य मिरवणूक पाहताना या सर्व आठवणी नजरेसमोरून गेल्या, अशा भावना प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांनी व्यक्त केल्या.

Advertisement
Tags :

.