यासाठीच वेदांतिकाराजे नगराध्यक्षा हव्या होत्या
सातारा :
गेल्या सात वर्षांपूर्वी सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये वेदांतिकाराजे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या. मात्र त्यांचा पराभव उदयनराजे गटाच्या माधवी कदम यांनी केला होता. त्यांचा विजय झाला असता तर नागरिकांच्या समस्या विकली सोडवल्या गेल्या असत्या त्याचा प्रत्यय आज त्यांनी स्वत: केसरकर पेठेत पाहणी केल्याच्या घटनेनंतर सातारकरांना आला. चार महिन्यापूर्वी केसरकर पेठेतील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार वेदांतिकाराजे यांनी पाहणी करून आरोग्य विभागास सूचना केल्या. शहरातील कचऱ्यावरून त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी शहरात पडत असलेला कचरा हा श्रीमंत वर्गाचा कचरा आहे, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सातारा नगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. सात वर्षांपूर्वी नगरपालिकेची निवडणूक पार पडली होती. त्यावेळी नगरविकास आघाडी विरुद्ध सातारा विकासाकडे अशी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून वेदांतिकाराजे या उभ्या होत्या. त्यांना नगराध्यक्ष करण्यासाठी नगरविकास आघाडी प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. मात्र त्यांना यश आले नाही. सातारा विकास आघाडीला यश आले होते. सर्वसामान्य घरातली महिला म्हणून सातारा विकास आघाडीने माधवी कदम यांना निवडून दिले होते. गेल्या दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. या प्रशासकीय राजवटीच्या कार्यकाळामध्ये नागरिकांच्या समस्या प्रशासन म्हणून मुख्याधिकारी अभिजीत बापट हे सोडवण्यामध्ये तत्पर आहेत. केसरकर पेठेतील हरिजन गिरिजन सोसायटी लगत असलेल्या अपार्टमेंटमधील नागरिकांनी ड्रेनेजच्या पाण्याची तक्रार वेदांतिकाराजे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी सातारा पालिकेला ही सूचना दिल्या होत्या. मात्र आज त्याच तक्रारीच्या अनुषंगाने अचानकपणे वेदांतिकाराजे यांनी केसरकर पेठेत पाहणी केली. कचऱ्याचे ढिग पाहून त्यांनी हा कचरा गरिबांचा कचरा वाटत नाही श्रीमंतांचा कचरा असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. कचरा पडू नये यासाठी पालिकेने स्पॉट बाय नेमले होते, त्याचे काय झाले, कोणावर कारवाई केली. याची विचारणा त्यांनी आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड यांना केली. तसेच शहरामध्ये अजिंक्य कॉलनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खालच्या बाजूच्या ओढ्यामध्ये अशा अनेक ठिकाणी कचरा पडत असतो त्यावरही उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी दिली.
याच दरम्यान त्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना फोन लावून कच्रयाबाबत समस्या सांगत केसरकर पेठेतील ट्रेनच्या कामाची ही विचारणा केली त्यावर अभिजीत बापट यांनी त्यांना प्रस्तावित कामांमध्ये मोठ्या ड्रेनेजच्या पाईपा टाकण्यात येणार आहे ते काम लवकर पूर्ण करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच स्पॉट बॉय ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे असेही त्यांनी यावेळी फोनवरून सांगितले. या पाहणी दौऱ्यावेळी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, अविनाश कदम, सातारा नगरपालिकेचे मुख्य अभियंता दिलीप चिद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.