For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

असे असते अभियान

06:02 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
असे असते अभियान
Advertisement

या अभियानाचे अनेक टप्पे असून अनेक प्रशिक्षितांचा त्यात समावेश असतो.

Advertisement

?या अभियानात किमान 24 उच्चप्रशिक्षित कमांडोज भाग घेतात. विमान चालक किंवा सैनिक कोठे बेपत्ता झाला आहे, त्याचे अनुमान आधी घेतले जाते.

?स्थान साधारणत: निश्चित झाल्यानंतर ‘ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स’च्या माध्यमातून आकाशातून शोध घेऊन त्यांचे स्थान अचूकपणे निश्चित केले जाते.

Advertisement

?बेपत्ता सैनिक किंवा व्यक्तीचे स्थान निश्चित झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून प्रशिक्षित कमांडो भूमीवर उड्या घेतात. त्यांना पॅराग्लायडिंग प्रशिक्षण दिलेले असते.

?शत्रूचे सैनिक किंवा नागरीक बेपत्ता सैनिकाला पकडत असतील, तर त्यांच्याशी सशस्त्र संघर्ष करुन सुटका करण्याचेही प्रशिक्षण कमांडोंना दिलेले असते.

?काहीवेळा सुटका करण्यासाठी स्थानिक जनतेचे किंवा स्थानिक संपर्काचेही साहाय्य घेतले जाते. यासाठी आधी प्रस्थापित असणाऱ्या संपर्काचे साहाय्य होते.

?ज्या स्थानी कमांडो हेलिकॉप्टर मधून उतरतात, तेथे सैनिक सापडला नाही, तर बरेचसे अंतर चालत जाऊन त्याचा शोध घेण्याचीही कमांडोंची क्षमता असते.

?सापडलेला सैनिक जखमी अवस्थेत असेल, तर त्याच्यावर प्रथमोपचार केले जातात, त्यासाठी सहभागी कमांडोंना अर्धवैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आलेले असते.

काही महत्वाची सुटका अभियाने

?सीएसएआर अभियानांना प्रथम महायुद्धापासूनचा इतिहास आहे. त्या महायुद्धात ब्रिटन आणि फ्रान्सच्या अनेक सैनिकांची अशी सुटका झाली होती.

?1943 मध्ये ब्रम्हदेशात अडकलेल्या मित्र राष्ट्रांच्या सैनिकांवर, हेलिकॉप्टरमधून तज्ञ सर्जन्सना पाठवून उपचार झाल्याने अनेकांचा जीव वाचला.

?1944 मध्ये जपानच्या सेनेच्या कचाट्यात अडकलेल्या मित्र राष्ट्रांच्या सैनिकांची सीएसएआरच्या माध्यमातून धाडसी सुटका करण्यात यश आले होते.

?19 वर्षे चाललेल्या व्हिएतनाम युद्धात अनेकदा अमेरिकेच्या सैनिकांची अशा प्रकारे सुटका करण्यात आली होती. त्या युद्धात असे अनेकदा घडलेले आहे.

?जवळ जवळ प्रत्येक युद्धात सैनिक किंवा वैमानिक बेपत्ता होण्याच्या घटना घडत असतात. प्रत्येकवेळी सीएसआयआरने अशी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Advertisement
Tags :

.