हा तर माझा छंद
1000 घरांमध्ये घुसणाऱ्या चोराचे उद्गार
जपानच्या क्यूशू क्षेत्रात एका इसमाला अलिकडेच एका संपत्तीत अवैध स्वरुपात शिरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या इसमाने 1 हजारांहून अधिक घरांमध्ये चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. अशा घरांमध्ये घुसल्याने मला ‘रोमांच’ जाणवतो, इतरांच्या घरांमध्ये घुसणे माझा छंद असून तो मी 1 हजारवेळा पूर्ण केला आहे. जेव्हा मला कुणी पाहणार की नाही याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या हातांना घाम फुटतो आणि यामुळे माझा तणाव कमी होत असल्याचे या इसमाने पोलिसांना सांगितले आहे.
आरोपीचे हे वक्तव्य हे प्रकरण केवळ गुन्हेगारी वृत्तीचे नसून मानसिक आरोग्याशी संबंधित असू शकते असे दर्शविणारे आहे. दजाइफू शहरातील रहिवासी असलेल्या आरोपीला अलिकडेच अटक करण्यात आली आहे. त्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घराचा मालक आणि त्याच्या पत्नीने त्याला घरासमोरील बगीच्यात पाहून त्वरित पोलिसांना कळविले होते. या घटनेत कुठल्याही चोरीची नोंद झालेली नाही, परंतु अशाप्रकारच्या घटना मानसिक अस्थिरतेच्या दिशेने इशारा करत असल्याने अधिकाऱ्यांनी याला गांभीर्याने घेतले आहे.
आरोपीने कुठल्याही घटनेत चोरी केलेली नाही, परंतु लोकांच्या खासगी आयुष्यात अशाप्रकारचे अतिक्रमण मोठी समस्या आहे. या घटनेने जपानमध्ये अशा गुन्ह्यांवर करडी देखरेख आणि कठोर कायद्यांची आवश्यकता समोर आली आहे.
2020 मध्ये अशाचप्रकारची घटना
यापूर्वी 2020 मध्ये जपाननमध्ये आणखी एका घुसखोरीचे प्रकरण समोर आले होते. एक ऑस्ट्रेलियन व्यक्तीला टोकियोत स्वत:च्या सासरच्या अपार्टमेंटमध्ये अवैध स्वरुपात प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो स्वत:च्या बेपत्ता मुलांचा शोध घेत होता. आरोपीने आरोप मान्य केल्याने त्याला सहा महिन्यांची शिक्षा झाली होती.