हा आहे पृथ्वीवरचा मंगळ!
जगातील सर्वात अजब आणि सुंदर बेटांपैकी एक आहे. येथील माती-वाळूच सर्वात मोठे आकर्षण आहे. येथे लोक खरोखरच वाळू खात असतात. स्थानिक लोक लाल रंगाच्या या खास वाळूला ‘गेलक’ म्हणतात आणि याला ब्रेडवर जामप्रमाणे लावून खात असतात. याचा स्वाद काहीसा नमकीन, गोड अन् खनिजांनी युक्त आहे. येथे येणारे पर्यटकही याची चव चाखत असतात. होर्मुझला ‘रेनबो आयलँड’ म्हणतात, कारण येथील माती-वाळू 70 हून अधिक रंगांमध्ये मिळते. लाल, पिवळ्या, नारिंगी, पांढऱ्या, हिरव्या, निळ्या, जांभळ्या रंगाची वाळूही येथे मिळून जाते. येथील ज्वालामुखी आणि खनिजांनी भरलेली जमीनही आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
आयलँडच्या लाल वाळूत आयर्न ऑक्साइड अधिक आहे, याचमुळे त्याचा स्वाद लोखडांसारखा आहे. स्थानिक लोक शतकांपासून याला मसाल्याप्रमाणे वापरत आले आहेत. विवाह सोहळ्यांमध्ये पाहुण्यांना गेलक खायला देणे येथे सामान्य बाब आहे. येथील रेड बीच आकर्षणाचे केंद्र असून येथील लाल वाळू पाहिल्यावर समुद्र जणू रक्ताने माखलेला असल्याचे वाटू लागते.
सायलेंट व्हॅली : येथे इतकी शांतता आहे की स्वत:च्या श्वासाचा आवाजही ऐकू येतो.
रेनबो व्हॅली : इराणमधील येथे एकाच ठिकाणी अनेक रंगांचे थरयुक्त पर्वत अस्तित्वात आहेत.
कार्पेट म्युझियम : येथील महिला रंगबिरंगी वाळूने पेंटिंग तयार करत असतात.
सॉल्ट माउंटेन अन् क्रिस्टल गुहा : मिठाचे चमकणारे खडक आणि आत हिऱ्यासारखे क्रिस्टल दिसून येतात. रात्री फोटो काढल्यास समुद्राच्या लाटा निळ्या रंगात चमकतात, ज्याला बायोल्यूमिनेसेंस देखील म्हटले जाते.
पूर्ण बेट केवळ 42 चौरस किलोमीटरचे आहे, एक टुक-टुक किंवा स्कूटर भाड्यावर घेत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सर्वकाही फिरून पाहता येते. तेथील प्रत्येक रंगाच्या मातीचा वेगवेगळा वापर केला जातो. लाल खाण्यात, पिवळी माती रंगाकरता, पांढरी माती प्लास्टरमध्ये वापरली जाते. मागील वर्षी इराणने भारतीय नागरिकांसाठी होर्मुझ बेट पूर्णपणे व्हिसाफ्री केले आहे.