For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हा तर पृथ्वीवरचा स्वर्ग

06:08 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
हा तर पृथ्वीवरचा स्वर्ग
Advertisement

वायू प्रदूषण, पाण्याची टंचाई, निर्भेळ अन्न मिळण्याची मारामार, वाढती गुन्हेगारी, अशांतता, ध्वनीप्रदूषण इत्यादी अडचणींनी सध्या मानवी जीवन गांजलेले आहे. शहरांमध्ये तर परिस्थिती चिंताजनक आहे. अशावेळी, या सर्व अडचणी जेथे नाहीत, इतकेच नव्हे, तर सर्वात प्रमुख असणारी पैशाची अडचण ही देखील जेथे जाणवणार नाही, असे कोणतेतरी स्थळ या पृथ्वीवर आहे, असे आपल्याला कोणी सांगितल्यास सांगणाऱ्याच्या मानसिक स्थितीविषयी आपल्याला संशय आल्याशिवाय राहणार नाही. पण असा एक देश या पृथ्वीच्या पाठीवर खरोखरच आहे.

Advertisement

या देशाचे नाव ‘आईसलँड’ असे आहे. या देशात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण अत्यल्प आहे. सुरक्षेची स्थिती तर जगात कोठेही नसेल इतकी उत्तम आहे. येथील पोलीस गस्त घालताना किंवा पहारा देताना बंदुकाचा उपयोग करत नाहीत. त्यांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी बंदुकांची आवश्यकताच भासत नाही कारण येथे शांततेचा भंग कधी होतच नाही. लोकसंख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे बहुतेक सर्व जीवनावश्यक वस्तू मुबलक आहेत. प्रदूषण वाढविणारे उद्योग येथे नाहीत. त्यामुळे हवा, पाणी आणि अन्न शुद्ध स्वरुपात मिळते. या देशाची लोकसंख्या केवळ 3 लाख आहे. बलात्कार, दरोडे, हत्या आदी जघन्य अपराध येथे दुर्मिळ आहेत. सामाजिक समानताही आहे. येथील उद्योगपतींची मुलेही सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांच्याच शाळेत जातात. येथे वातावरण गरम होते, ते केवळ एखाद्या ज्वालामुखीचा स्फोट झाला तरच. जिवंत ज्वालामुखींची संख्या या शांत देशात मोठी आहे, ही एक नैसर्गिक विसंगतीच म्हणावी लागेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

एवढे आनंददायक वातावरण असूनही येथे लोक पैसा भरपूर कमावतात. पण पैशामुळे येणाऱ्या माजाला किंवा मस्तीला दूर ठेवण्यात त्यांना यश आले आहे. येथे विचारात घेण्यासारखी एकच समस्या आहे. ती म्हणजे महिला आणि पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन मात्र मिळत नाही. ते मिळावे यासाठी काही दिवसांपूर्वी येथील महिलांनी संप केला होता. महत्वाचे आश्चर्य म्हणजे, या संपात या देशाच्या पंतप्रधान कॅथरिन यॉकब्जडॉरिट याही समाविष्ट झाल्या होत्या. या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे हा देश पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.