For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेरा आरोपी जामिनावर मुक्त

03:00 PM Apr 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
तेरा आरोपी जामिनावर मुक्त
Advertisement

पणजी : उत्तर गोव्यातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबच्या अग्निकांड प्रकरणातील 25 मृत झालेल्या पीडितांसंबंधी दोषी मानले गेलेल्यांपैकी शेवटचे राजीव मोडक आणि बिजय कुमार सिंग या दोन व्यवस्थापकांनाही काल शुक्रवारी सशर्त जामीन मिळाला. यामुळे फरारी म्हणून जाहीर करण्यात आलेले मूळ मालक सुरिंदर कुमार खोसला यांना वगळता अन्य सर्व 13 आरोपी सध्या जामिनावर सुटले आहेत.  ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबचे दिल्लीस्थित मालक असलेले गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना सदर क्लबच्या अग्निकांडातील 25 जणांच्या मृत्यूस  दोषी मानले जात असले तरी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बनावट ‘एनओसी’ वापरल्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका केली आहे.

Advertisement

म्हापसा पोलिसांनी नोंदवलेल्या ‘आरोग्य ना हरकत प्रमाणपत्र   बनावट’ प्रकरणात म्हापसा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी 50,000 ऊपयांच्या वैयक्तिक जामीनपत्रावर त्यांची सुटका करण्याचे निर्देश दिले होते. मात्र दोन प्रकरणांमध्ये जामीन मिळाल्यानंतर लगेचच लुथरा बंधूंना मोठा धक्का बसला. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या मालकीच्या ‘बर्च बाय रोमियो लेन’ या आस्थापनाची अंदाजे 17.45 कोटी ऊपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी असलेला अजय गुप्ता याची म्हापसा पोलिसांनी नोंदवलेल्या दस्तऐवज बनावट प्रकरणात जामिनावर पहिल्यांदा सुटका झाली होती. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये विवेक सिंग, प्रियांशु ठाकूर, राजवीर सिंघानिया, माजी सरपंच रोशन रेडकर, बडतर्फ सचिव रघुवीर बागकर हेही जामिनावर मुक्त झाले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.