महिन्यातील तिसरे जहाज मुरगाव बंदरात
12:56 PM Mar 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
26 हजार मेट्रिक टन इंधन, 15 दिवसांचा साठा
Advertisement
वास्को : मे. सन्मार सितारा हे इंधनवाहू जहाज गुरुवारी मुरगाव बंदरात 26 हजार मेट्रिक टन इंधनासह दाखल झाले. या जहाजात 18 हजार मेट्रिक टन डिझेल तर 8 हजार मेट्रिक टन पेट्रोल आहे. नियमित सेवांतर्गतच हे जहाज इंधन साठ्यासह आलेले असून गोव्यात इंधन टंचाई नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. दर महिन्याला गोव्यातील मुरगाव बंदरात तीनवेळा इंधन साठ्यासह जहाजे येतात. गुरुवारी दाखल झालेले या महिन्यातील तिसरे जहाज आहे. त्यामुळे गोव्यात पुढील पंधरा दिवसांचा इंधन साठा उपलब्ध आहे यावर पुन्हा प्रकाश पडला आहे.
Advertisement
Advertisement