For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय कराटे चॅम्पीयनशिपमध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंचा डंका

03:19 PM Dec 28, 2023 IST | अनुजा कुडतरकर
राष्ट्रीय कराटे चॅम्पीयनशिपमध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंचा डंका
Advertisement

५८ मेडल्स मिळवीत तृतीय क्रमांकांची मिळवली ट्रॉफी

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप मध्ये ओकिनावा गोजूकान कराटे-डो मार्शल आर्ट असोशिएशन, सिंधुदुर्ग. या संस्थेच्या सावंतवाडी, कुडाळ व ओरोस येथे सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षणाच्या एकूण २९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात काता व कुमीते या दोन्ही खेळांमध्ये गोल्ड मेडल्स = २१, सिल्व्हर मेडल्स = २६, व ब्रॉन्झ्स मेडल्स = ११ अशी एकूण ५८ मेडल्स मिळवून स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकांची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. यात मुलींमध्ये तन्वी लुडबे, प्रांजल गावडे, निहारीका मेस्री, अदिती नाटलेकर, सिया गावडे, राशी वेल्हाळ, पुर्वा गवस, श्रावणी सावंत, लिशा नायर, भावी सावंत, श्रावणी म्हाडेश्वर, स्वरा वाटवे, मृणाल नाईबागकर, भाग्यलक्ष्मी राऊळ तर मुलांमध्ये मयुरेश राऊत, यश गावडे, रोनक नाईक, यशदिप वाडकर, सक्षम गावडे, रिजूल परब, दिप राऊळ, तेजस चव्हाण, इशांत पवार, ओंकार गुरव, सानिध्य वेल्हाळ, हर्ष सावंत, अर्णव गावडे, सोहम सावंत, स्वयम राऊळ अशा एकूण २९ खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या सर्व खेळाडूंना कराटे प्रशिक्षक माजी सैनिक श्री दिलीप बाळकृष्ण राऊळ सरांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :

.