तिसऱ्या पिढीतील ‘रेनॉ डस्टर’ लाँच
नवी दिल्ली :
रेनॉ इंडियाने भारतात आपल्या लोकप्रिय एसयूव्ही ‘डस्टर’ तिसऱ्या पिढीचे मॉडेल लॉन्च केले आहे. याची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत 10.29 लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरिएंटसाठी 18.49 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने नवीन डस्टर आर-जीएमपी (आरजीएमपी) प्लॅटफॉर्मवर विकसित केली आहे. नवीन डस्टर केवळ लूकमध्ये अधिक दणकट झाली नाही, तर तिला पहिल्यांदाच एक शक्तिशाली हायब्रीड इंजिन आणि 2 टर्बो इंजिनचा पर्यायही देण्यात आला आहे. या कारमध्ये गूगल ओएससह टच क्रीन, 700 लिटर बूट स्पेस, 360-डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्यो मिळतील. त्याचबरोबर, 6 एअरबॅग्जसह 31 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आणि 17 अॅडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टीम्सदेखील उपलब्ध होणार आहे.
2012 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झालेल्या डस्टरने भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटची सुरुवात केली, जे 2022 मध्ये बंद करण्यात आले. आता 3 वर्षांनंतर ती भारतात दाखल झाली आहे. कंपनीने 27 जानेवारी रोजी एका नवीन डिझाइनसह तिचे अनावरण केले होते.
तिच्या बुकिंगला सुरूवात झाली आहे. टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटची डिलिव्हरी एप्रिलपासून सुरू होईल, तर हायब्रीड दिवाळीच्या आसपास उपलब्ध होईल. ही ह्युंडाई क्रेटा, टाटा सिएरा, किया सेल्टोस, मारुती व्हिक्टोरिस, मारुती ग्रँड व्हिटारा, टोयोटा हायरायडर यांच्याशी स्पर्धा करेल.
बाह्यरूप: वाय-आकाराचे हेडलॅम्प्स आणि 18-इंची अलॉय व्हील्स.
नवीन पिढीची डस्टर सीएमएफ-बी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. हा प्लॅटफॉर्म डॅशिया, रेनॉल्ट आणि निस्सान यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. नवीन डस्टरचे डिझाइन जागतिक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या डॅशिया मॉडेलपासून प्रेरित आहे.
पुढील प्रोफाइल: चौकोनी एलईडी हेडलाइट्स आणि ग्रिलवरील मोठ्या अक्षरांतील ‘डस्टर’ ब्रँडिंगमुळे रस्त्यावर तिला एक आक्रमक रूप प्राप्त होते. नवीन डिझाइनचा फ्रंट बंपर आणि उभ्या एअर इनलेट्ससह स्किड प्लेट्स आहेत. बंपरला सिल्व्हर स्किड प्लेट आणि पिक्सेलसारखे फॉग लॅम्प्स आहेत.
साइड प्रोफाइल: यात नवीन 18-इंची अलॉय व्हील्स आणि जाड बॉडी क्लॅडिंग, चौकोनी व्हील आर्च मिळतात, जे याला एक आक्रमक ऑफ-रोडर लूक देतात. ही कार 5 आणि 7 सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
इंटिरियर: 10.1 इंच टचक्रीन आणि हलक्या आणि गडद काळ्या रंगांच्या छटा असलेला डबल-लेयर डॅशबोर्ड आहे. उच्च व्हेरिएंटमध्ये दोन डिजिटल क्रीन्स राहणार आहे.