For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पुरुषांचा सलग तिसरा विजय

06:13 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पुरुषांचा सलग तिसरा विजय
Advertisement

वृत्तसंस्था, ग्लास्गो

Advertisement

2026 च्या ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लॉन बाऊल्स क्रीडा प्रकारात भारताच्या नवनीत सिंग आणि दिनेशकुमार या जोडीने आपली विजयी घोडदौड कायम राखताना बोट्स्वानाचा तिसऱ्या फेरीतील सामन्यात टायब्रेकरमध्ये पराभव करत सलग तिसरा विजय नोंदविला.

या क्रीडा प्रकारातील तिसऱ्या फेरीतील खेळविण्यात आलेल्या ब विभागातील दुसऱ्या सामन्यात भारताच्या नवनीत सिंग आणि दिनेशकुमार यांनी बोट्स्वानाच्या जोडीचा पहिल्या सेटमध्ये 9-2 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये भारताने सुरुवातीला 3-1 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर बोट्स्वानाच्या जोडीने हा दुसरा सेट 4-3 असा जिंकून भारताशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये बोट्स्वानाची जोडी केझर गिचे आणि चार्लस डिटेको यांनी अचूक खेळ करत टायब्रेकरपर्यंत हा सेट लांबविला. पण टायब्रेरमध्ये भारताने बोट्स्वानाचे आव्हान संपुष्टात आणले. नवनीत आणि दिनेश या भारतीय जोडीने या क्रीडा प्रकारात आपले तिन्ही सामने जिंकले असून त्यांना आता बाद फेरीत प्रवेश मिळविण्याची संधी मिळू शकेल. या क्रीडा प्रकारात भारताचा ब विभागात समावेश असून इंग्लंड, नामिबिया, फॉकलँड आयलंड्स, कुक आयलंड्स आणि बोट्स्वाना यांचा समावेश आहे.

Advertisement

महिलांच्या एकेरीतील क विभागातील झालेल्या लढतीत मलेशियाच्या इमा सरोजीने भारताच्या नयनमोनी साकीयाचा 1.5-0.5 अशा गुणांनी पराभव केला.

Advertisement
Tags :

.