For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात जाण्यापूर्वी दोनवेळा विचार करा!

07:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात जाण्यापूर्वी दोनवेळा विचार करा
Advertisement

अमेरिकेच्या प्रवासविषयक सूचनांमध्ये धोकादायक देश असा उल्लेख

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

अमेरिकेच्या विदेश विभागाने पाकिस्तानसाठी स्वत:ची प्रवासविषयक सूचना अद्ययावत केली आहे. यात पाकिस्तानला जाण्याची योजना आखणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांना नियोजन करण्यापूर्वी दोनवेळा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकेची मर्जी सांभाळू पाहणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख जनरल आसीम मुनीर यांना यामुळे झटका बसला आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने प्रवासविषयक सूचनांमध्ये अनेक अपडेट केले असून यात पाकिस्तानात गुन्हेगारी, नागरी अशांतता, दहशतवाद आणि अपहरणाचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेचा विदेश विभाग विविध धोक्यांच्या हिशेबानुसार प्रवासविषयक सूचना जारी करतो. याला धोक्यांच्या आधारावर चाग वेगवेगळ्या स्तरांवर विभागण्यात आले आहे.

Advertisement

दहशतवादी हल्ल्याचा धोका

प्रवासविषयक सूचनांमध्ये पाकिस्तानला पातळी क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात आले असून ही उच्चधोका असलेली श्रेणी आहे. कुठल्याही इशाऱ्याशिवाय दहशतवादी हल्ले होऊ शकणाऱ्या देश आणि क्षेत्रांविषयी पातळी क्रमांक 3 आहे. दहशतवाद्यांकडून परिवहन केंद्र, हॉटेल, बाजार, शॉपिंग मॉल, सैन्य आणि सुरक्षा स्थळ, विमानतळ, रेल्वे, शाळा, रुग्णालये, प्रार्थनास्थळ आणि सरकारी इमारतींना लक्ष्य केले जाऊ शकते, असे विदेश विभागाने म्हटले.

खैबर पख्तूनख्वा सर्वात धोकादायक ठिकाण

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाच्या काही हिस्स्यांना सर्वात धोकादायक श्रेणी 4 मध्ये सामील करण्यात आले असून येथे अमेरिकेच्या नागरिकांना कुठल्याही कारणासाठी प्रवास न करण्याची सूचना केली गेली आहे. प्रांतात सरकारी अधिकारी आणि नागरिकांच्या विरोधात हत्या आणि अपहरणाचे प्रयत्न सामान्य बाब असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा  इशारा पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकेच्या नागरिकांवरही लागू होतो.  पाकिस्तानातील स्थानिक कायदे विनाअनुमती निदर्शनांवर बंदी घालणारे असून यात भाग घेणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सोशल मीडियावर सरकार, सैन्य किंवा अधिकाऱ्यांवर टीका करणारे कंटेंट पोस्ट केल्यासह ताब्यात घेतले जाऊ शकते अस इशारा अमेरिकेच्या विदेश विभागाने स्वत:च्या नागरिकांना दिला आहे.

Advertisement
Tags :

.