महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव-सुळेभावी बसमध्ये चोरट्यांनी एकाच दिवशी चार मोबाईल-रोख रक्कम लांबविली

09:42 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रवाशांमध्ये खळबळ : पोलिसांनी सीबीटी बसस्थानकात गस्त वाढवण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

बेळगाव-सुळेभावी बसमध्ये चोरट्यानी एकाच दिवशी चार मोबाईल संच व रोख रक्कम लांबविल्याने प्रवाशांमध्ये खळबळ माजली आहे. तरी पोलिसांनी सीबीटी बसस्थानक येथे गस्त वाढवून चोरट्यांना गजाआड करावे, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. अलीकडच्या काळामध्ये महिलांसाठी असलेल्या मोफत बससेवा योजनेमुळे बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशातच बेळगाव-सुळेभावी मार्गावर कमी बसफेऱ्या आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या बसेसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. विशेष करून दर मंगळवारी व शुक्रवारी बेळगाव-सुळेभावी बसमध्ये जास्त गर्दी असते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शुक्रवारी बेळगाव-सुळेभावी बसमध्ये प्रिया मनोज पाटील रा. बाळेकुंद्री खुर्द यांचा मोबाईल संच व 3000 रुपये असलेली पर्स, तसेच आणखीन एका महिलेची पर्स चोरट्यानी लांबविली. तसेच होनीहाळ येथील जवानाच्या पत्नीचा किमती मोबाईल संच व सुळेभावी येथील एका महिलेचा मोबाईल संच चोरट्यांनी हातोहात लांबविला. मोबाईल संच व रोख रक्कम लांबविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बस थांबवून चोरट्यांचा शोध घेण्यात आला. मात्र चोर आपला डाव साधून मागील बसथांब्यावर उतरले होते. मोबाईल चोर सीबीटी बसस्थानकावर गर्दी असलेल्या बसमध्ये चढतात व मोबाईल संच व रोख रक्कम लांबून लगेच ते पुढच्या थांब्यावर उतरतात. हा त्यांचा रोजचा उपक्रम असून याकडे राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासीवर्गातून होत आहे. मोबाईल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून या प्रकाराला प्रवासीवर्ग ही अक्षरश: कंटाळले आहेत. शहर बसस्थानक सीबीटी येथे चोरट्यांचा वावर असतो. याबाबत राज्य परिवहनचे कर्मचारी व पोलिसांना याची कल्पना असून ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने चोरटे माजले आहेत, असा आरोप प्रवासीवर्गातून होत आहे. तरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या साहित्याची खबरदारी स्वत:च घेणे गरजेचे बनले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article