For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चोरट्यांनी 43 तोळे दागिने लांबविले

11:59 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
चोरट्यांनी 43 तोळे दागिने लांबविले
Advertisement

कोकटनूर येथे बंद घरात चोरी : तिघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : पोलिसांकडून तपास सुरू

Advertisement

वार्ताहर/अथणी

अथणी तालुक्यात चोरीचे सत्र सुरुच आहे. तालुक्यातील कोकटनूर येथील नूरअहमद कावरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 43 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घडला. तसेच 50 हजार रुपयांची रोकडही लांबविल्याने परिसरात भीती पसरली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी अथणी शहरांमध्ये एकाच रात्रीमध्ये 12 घरे फोडून सोने, रोकड आणि लॅपटॉप लंपास केल्याची घटना ताजी असताना कोकटनूर येथे  चोरट्याने घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. दरम्यान कोकटनूर येथेही लाखो रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.

Advertisement

सदर चोरी प्रकरणातील तिघे संशयित सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. याबाबत ऐगळी पोलिसांत प्रकरण दाखल झाले आहे. अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुनोळी, रवींद्र नायकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कुमार हडकर, पीएसआय राकेश बगली, पीएसआय चंद्रशेखर नागनूर यांनी तपास पथके तयार करून ठिकठिकाणी तपास सुरू केला आहे. अथणी तालुक्यामध्ये चोरीच्या घटना वाढल्या असून बहुतांशी ठिकाणी चोरट्यांनी बंद घरांमध्येच चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान नागरिकांनीही परगावी जाताना दागिने अथवा रोकड सुरक्षित ठिकाणी किंवा बँक लॉकरमध्ये ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच पोलिसांनीही चोरीच्या घटना रोखण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.