Pandharpur news | चोरट्यांचा सुळसुळाट! बोलेरोची काच फोडली अन् द्राक्ष व्यापाऱ्याचे ३ लाख घेऊन चोरटा पसार
पंढरपूरमध्ये धाडसी चोरी;
पंढरपूर -तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये पाटील हॉ स्पिटलसमोर बोलेरो गाडी पार्किंगमध्ये उभी असताना अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून बॅगेतील तीन लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
२२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ७.३० च्या सुमारास पाटील हों स्पिटलसमोर फिर्यादी कैलास जगन्नाथ वारुळे यांनी बोलेरो (यूपी ६५-एफए ३५८१) पार्किंगमध्ये उभी केली होती. गाडीची काच फोडून गाडीत असलेली काळ्या रंगाच्या बॅगेमध्ये ठेवलेल्या तीन लाख रुपयांची रोकड चोरट्याने नेली.
या रकमेमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा, द्राक्ष व्यापाऱ्यांच्या हिशेबाच्या पाच डायऱ्या असा माल असून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास बरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ बाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल पकाले करीत आहेत.