For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : वडणगे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, २ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

03:41 PM Feb 02, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   वडणगे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ  २ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास
Advertisement

                                       वडणगे परिसरात घरफोडी

Advertisement

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील सासने मळा, शिव पार्वती कॉलनी, तसेच विजय हौसिंगी सोसायटी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दोन ठिकाणी चोरी करून चोरट्यांनी २ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत अधिक माहिती अशी की, विजय हौसिंग सोसायटी येथील सतीश यादव कुटूंबियांसह परगावी गेले होते. शनिवारी ते परत आले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.

त्यांच्या घरातील सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ७५ हजाररुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सासने मळा येथील दीपक कोपल हे कुटूंबासह त्यांच्या मूळ गावी गेले होते. शनिवारी सकाळी ते परत आले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती करवीर पोलिसांना दिली. त्यांच्या घरातील एक तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, ४० हजार रुपये रोख लंपास केले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.